दहावीच्या विद्यार्थ्याने संपवलं जीवन, खिशात सापडलेल्या नोटमध्ये शाळेतल्या मास्तरांचे नाव, ‘सुर्यवंशी मास्तर माझ्या…’

 बुलढाणा जिल्ह्यातील वसाडी बुद्रुक येथे एका दहावीच्या विद्यार्थ्यांने वर्गात शिक्षकाने प्रश्न न उत्तरल्याने शारीरिक शिक्षा केल्यामुळे आत्महत्या केली. शिक्षक गोपाल सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्याला उठाबशा काढायला लावल्या आणि कपडे काढण्यास सांगितल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली असून पोलिसांनी शिक्षकाला ताब्यात घेतले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील वसाडी बुद्रुक येथे राज्याला हादरून घडणारी घटना समोर आली आहे. मुलं किती संवेदशील झाली आहे हे यावरून दिसून येते. वर्गात विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर न दिल्यामुळे शिक्षकाने शारीरिक शिक्षा केल्याने अपमानित झालेल्या दहावीतील विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना एक जुलै दुपारी वसाडी बुद्रुक येथे घडली. याप्रकरणी पिंपळगाव राजा पोलिसांनी संबंधित शिक्षकाला ताब्यात घेतले आहे.बुलढाणामधील मृतक विद्यार्थी विनायक महादेव राऊत (वय वर्ष 15) राहणार वसाडी बुद्रुक हा जय बजरंग विद्यालयात दहावी मध्ये शिक्षण घेत होता.

वर्गात विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर न दिल्यामुळे वर्गशिक्षक गोपाल मारुती सूर्यवंशी राहणार खामगाव यांनी त्याला उभे राहून उठाबशा करण्याची शिक्षा दिली विनायकने पाय दुखत असल्याचे सांगून नकार दिल्यावर शिक्षकाने त्याला कपडे काढण्यास सांगितले अशी खळबळ जनक माहिती समोर आली आहे. झालेल्या या अपमानामुळे मानसिक धक्का बसलेल्या विनायकने शेतातील घरात अँगलला दोरी बांधून फास घेऊन आपले जीवन संपवले. या घटनेने संपूर्ण जिल्ह्याचे राज्यात एकच खळबळ उडाली.किती टोकाला जाऊन विनायक ने हा निर्णय घेतला असेल काय त्याच्या मनाच्या भावना असतील हा विचार न केलेलाच बरा. ज्या कवळ्या मनात शिक्षण घेण्याचं व एक उमेदीने जगण्याची जिद्द असते त्याच वयामध्ये विनायकने हे टोकाचे पाऊल उचलल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेनंतर गावकऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पिंपळगाव राजा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मुकेश गुजर यांनी तातडीने घटनास्थळी पोचून पंचनामा केला.विनायकच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीत शिक्षक सूर्यवंशी यांनी मानसिक छळ केला तसेच पालकांविषयी अपशब्द वापरून अपमान केल्याचे नमूद करण्यात आले आहे. शिक्षकांनी कपडे काढ अशी अपमान भाषा वापरल्यानंतर विनायक प्रचंड मानसिक तणावात गेला. वडिलांना सांगतो असे शिक्षकाने म्हटल्यावर तो अधिक घाबरला होता. त्यानंतर वर्गातील इतर विद्यार्थ्यांना अखेरचे पाहून घ्या पुन्हा भेटणार नाही असे सांगून तो वर्गातून निघून गेला अशी चर्चा गावात आहे घटनेनंतर जय बजरंग विद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कोणीही स्पष्टपणे बोलण्यास तयार नाही मात्र काही ग्रामस्थांनी या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली आहे. या घटनेनंतर संताप्त ग्रामस्थांनी शाळेत धाव घेतली. शिक्षकाला जाब विचारत पोलिसांनी तत्काळ कारवाई करत शिक्षक सूर्यवंशी यांना ताब्यात घेतले आहे.ग्रामस्थांनी सांगितले संबंधित शिक्षक यापूर्वी अशाच प्रकारे गैरव वर्तन करत होते. या विरोधात तक्रार करूनही केवळ बदली करून पुन्हा वसाडी येथेच नियुक्ती करण्यात आली होती. वेळीच कठोर कारवाई झाली असती तर हुशार विद्यार्थ्यांचा जीव वाचला असता अशी भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. याप्रकरणी पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.