पावसामुळे नियंत्रण सुटलं, बाईकस्वार आधी बॅरिकेटला धडकून ट्रकला आदळले, दोघांचा जागीच मृत्यू, भंडाऱ्यात नव्या बायपास हायवेवर भीषण अपघात.

दुचाकीस्वार हे नागपूरकडून साकोलीच्या दिशेनं जाणाऱ्या लेनवरून भरधाव निघाले होते. यावेळी महामार्गाचं काम सुरू असल्यानं कन्स्ट्रक्शन कंपनीचा ट्रक तिथं उभा होता.  भंडारा शहरालगत सुरू असलेल्या नवीन बायपास महामार्गावर रविवारी रात्री उशिरा भीषण अपघात झाला. साई समर्थ कन्स्ट्रक्शन कंपनीच्या उभ्या ट्रकवर भरधाव दुचाकी जाऊन धडकल्याने दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला.मृतांमध्ये सोनू पांडुरंग पालवे (वय 23) आणि मृणाल दत्तात्रय मानवटकर (वय 25) या दोन युवकांचा समावेश आहे. पाऊस सुरू असल्यानं दुचाकीस्वाराचा वाहनावरील ताबा सुटला आणि बॅरिकेटिंगला धडकून नंतर दुचाकी ट्रकच्या मागील भागाला धडकली आणि हा अपघात घडला. भंडारा पोलिसांनी अपघातास कारणीभूत कन्स्ट्रक्शन कंपनीचा ट्रक ताब्यात घेतला असून घटनेचा अधिक तपास सुरु आहे.या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून महामार्गावरील सुरक्षा व्यवस्था आणि काम सुरू असताना घेतली जाणारी काळजी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. दुचाकीस्वार हे नागपूरकडून साकोलीच्या दिशेनं जाणाऱ्या लेनवरून भरधाव निघाले होते. यावेळी महामार्गाचं काम सुरू असल्यानं कन्स्ट्रक्शन कंपनीचा ट्रक तिथं उभा होता.

दुचाकी ट्रकच्या मागच्या बाजूला जाऊन धडकली भंडारा शहरालगत निर्माणाधीन बायपास महामार्गावर साई समर्थ कन्स्ट्रक्शन कंपनीच्या उभ्या ट्रकवर भरधाव दुचाकी धडकली. या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये सोनू पांडुरंग पालवे (वय 23) आणि मृणाल दत्तात्रय मानवटकर (वय 25) या दोन युवकांचा समावेश आहे. दोघेही नागपूर येथून साकोलीकडे जाणाऱ्या लेनवरुन दुचाकीवरून निघाले होते. भरधाव वेगात जात असताना पावसामुळे रस्ता ओला झाला होता. त्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि दुचाकी थेट महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकच्या मागच्या भागावर जाऊन आदळली. त्याआधी बॅरिकेटिंगला धडक दिल्याचेही सांगितले जात आहे. महामार्गाचे काम सुरू असल्याने त्या भागात सावधगिरी बाळगणे आवश्यक होते. मात्र, कन्स्ट्रक्शन कंपनीकडून उभ्या ट्रकभोवती आवश्यक त्या सूचनाफलकांचा, दिव्यांचा आणि प्रतिबंधक चिन्हांचा अभाव होता. त्यामुळेच अंधार आणि पावसामुळे रस्ता स्पष्ट दिसला नसल्याने हा दुर्दैवी अपघात घडल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली. भंडारा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि दोघांनाही रुग्णालयात हलवले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. पोलिसांनी कन्स्ट्रक्शन कंपनीचा ट्रक ताब्यात घेतला असून चालकाची चौकशी सुरू केली आहे. अपघाताचा तपास सुरू असून काम करणाऱ्या कंपनीची जबाबदारी निश्चित केली जाणार आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. भंडारा – गोंदियात तीन वेगवेगळ्या अपघातात चौघांचा मृत्यू तर, 11 जण जखमी भंडारा-गोंदिया जिल्ह्यात झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला तर 11 जण जखमी झालेत. भंडाऱ्याच्या बायपास महामार्गावर दुचाकीची उभ्या ट्रकला धडक बसली यात दोघांचा मृत्यू झाला. तर, गोंदिया जिल्ह्यात देवरी- चिचगड मार्गावर भरधाव कार उलटून दोघांचा मृत्यू झाला. तर कार मधील एक जण किरकोळ जखमी झाला. गोंदिया जिल्ह्यात दुसरा अपघात कोहमारा मार्गावर झाला. यात शिवशाही बसचा झालेल्या अपघातात बसमधून प्रवास करणारे 10 प्रवासी किरकोळ जखमी झालेत.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.