हिमाचल प्रदेशमध्ये ढगफुटी सदृश्य पडलेल्या पावसामुळे महाराष्ट्रातील पर्यटक अडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यामधील काही पर्यटक सातारा जिल्ह्यातील असल्याची ही शक्यता वर्तवली जात आहे.हिमाचल प्रदेशमध्ये ढगफुटी सदृश्य पडलेल्या पावसामुळे महाराष्ट्रातील पर्यटक अडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यामधील काही पर्यटक सातारा जिल्ह्यातील असल्याची ही शक्यता वर्तवली जात आहे. हिमाचल प्रदेशमध्ये सध्या ढगफुटी सदृश्य पाऊस पडला असल्यामुळे पर्यटनासाठी फिरण्यास गेलेले महाराष्ट्रातील काही पर्यटक या पूर परिस्थितीमध्ये अडकले असल्याची माहिती समोर येत असून यामध्ये काही पर्यटक सातारा जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, याबाबत अजूनही प्रशासनाकडून कोणताही या घटनेला दुजोरा दिला नसून यामधून कोणतीही पर्यटकांची अद्याप आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही.










