9 तासाच्या चाैकशीत संदिपान भुमरेंच्या चालकाची उडवाउडवीची उत्तरे; 150 कोटींच्या जमीन गिफ्ट प्रकरणी पाय खोलात?

खासदार संदिपान भुमरे यांचे चालक जावेद शेख अडचणीत आला आहे. सालारजंग यांच्या वंशजांनी जावेदला करोडो रुपयांची जमीन बक्षीस दिली. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने जावेदची नऊ तास चौकशी केली. चौकशीत जावेदने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे त्याला पुन्हा चौकशीसाठी बोलावले आहे.सालारजंग यांच्या वंशजानी संदिपान भुमरे यांचा चालक जावेद याला तब्बल 150 कोटींची जमीन हीजानामा (गिफ्ट) केली. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने भुमरे यांच्या ड्रायव्हरची चौकशी केली. नऊ तास झालेल्या चौकशीत पोलिसांनी जावेदला प्रश्नावली दिली होती. यात जावेदने समाधानकारक उत्तरे दिली नाही. या संपूर्ण चौकशीत जावेदने पोलिसांना सहकार्य केलं नसल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे, यामुळे पोलीस पुन्हा जावेदला चौकशीसाठी बोलावणार आहेत.छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे खासदार संदिपान भुमरे यांचे चालक जावेद शेख याला सालारजंग यांच्या वंशज असलेल्या मीर मेहमूद यांनी दीडशे कोटी रुपये किंमतीची जागा गिफ्ट दिली. परभणीच्या एका वकिलांनी आर्थिक गुन्हे शाखेला याप्रकरणी तक्रार दिली.

या तक्रारीनंतर आर्थिक गुन्हे शाखेने संदिपान भुमरे यांचे चालक शेख जावेद याला चौकशीसाठी बोलावले. शेख जावेद वकिलासह आर्थिक गुन्हे शाखेत आला. यावेळी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संभाजी पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सय्यद यांनी जावेदची नऊ तास चौकशी केली.जावेदला प्रश्नावली देण्यात आली होती. यामध्ये सालारजंग यांचे वंशज मीर महमूद यांनी तुम्हाला दीडशे कोटींची जागा दिली. जावेद यांचे मीर मेहमूद यांच्याशी नाते काय? हिबानामा नामा कोणत्या आधारावर झाला? तुम्हालाच जमीन कशी मिळाली? तक्रारदार यांच्या दाव्यानुसार जमीन त्यांना हिबानामा करून देण्यात आली होती तर तुमच्या नावे दुसरा हिबानामा कसा केला? असे प्रश्न विचारण्यात आले.

याप्रकरणी जावेद याने समाधानकारक उत्तरे दिले नसल्याने पोलिसांनी जावेद याला पुन्हा चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले आहे.याप्रकरणी थेट संदिपान भुमरे यांच्यावरच आरोप केली जात आहेत. मात्र, भुमरे कुटुंबियांकडून अगोदरच स्पष्ट करण्यात आले की, आमचा याप्रकरणाशी काहीही संबंध नाहीये. तो आमच्याकडे चालक आहे आणि सकाळी कामाला येतो आणि रात्री परत त्याच्या घरी निघून जातो. त्यानंतर तो काय करतो काय नाही, याबद्दल आम्हाला काहीही माहिती नाही. संदिपान भुमरे यांचा चालक जावेद असल्याने या प्रकरणात असल्याने विविध चर्चांना उधाण आल्याचे बघायला मिळत आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.