मावळ तालुक्याचे माजी आमदार कृष्णराव भेगडे यांचे सोमवारी रात्री ९ च्या सुमारास निधन झाले. मावळ तालुक्यातील धुरंदर नेते अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या कारकिर्दीबाबत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार भावून झाले. मावळ तालुक्याचे माजी आमदार कृष्णराव भेगडे यांचे सोमवारी रात्री ९ च्या सुमारास निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. मावळ तालुक्यातील धुरंदर नेते अशी त्यांची ओळख होती. जनसंघ पासून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. दोन वेळा ते मावळ मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले होते. त्यांनी २ वेळेस विधानपरिषदेचे प्रतिनिधित्व देखील केले होते.
मावळ तालुक्याच्या राजकीय, सामाजिक, आरोग्यासह विशेषतः शैक्षणिक क्षेत्रांवर त्यांचा मोठा प्रभाव होता. पुण्यातील मावळ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार कृष्णराव भेगडे हे मावळ तालुक्याील, पुणे जिल्ह्यातील ज्येष्ठ, मार्गदर्शक नेतृत्व होते. त्यांच्या निधनाने शेती, उद्योग, व्यापार, सहकार, शिक्षण अशा अनेक क्षेत्रात प्रदीर्घ काळ कार्यरत असलेले, मावळच्या, पुण्याच्या विकासासाठी समर्पित नेतृत्व हरपलं आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणाले की, दोनच आठवड्यापूर्वी १७ जून रोजी पवना हॉस्पिटलमध्ये जाऊन मी त्यांची भेट घेतली होती. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. त्यांना बोलताना त्रास होत होता, परंतु ते बोटांच्या खुणांनी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होते. ती आमची शेवटची भेट ठरेल, असं कधीच वाटलं नाही. त्यांच्या निधनाची बातमी ऐकून धक्का बसला.









