विद्यार्थ्यांची डोकी उडतील, आम्ही शाळेत बॉम्ब ठेवलाय; धमकीने पुण्यात खळबळ, पुढे काय घडलं?

पुण्यातील औंध भागातील सिटी इंटरनॅशनल स्कूलला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली. शाळेच्या ईमेलवर ‘रोडकिल’ आणि ‘क्यो’ या दहशतवादी संघटनेच्या नावाने स्फोटके ठेवल्याचा मेल आला होता. पोलिसांनी तातडीने तपासणी करून शाळा सुरक्षित असल्याची खात्री केली असून, धमकी देणाऱ्याचा शोध सुरू आहे. चतु:श्रृंगी पोलिसांनी परिसरातील इतर शाळांनाही सतर्क केले आहे.पुण्यात एका शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती. औंध भागातील सिटी इंटरनॅशनल स्कूलला 30 जून रोजी सकाळी 11:50 वाजता ईमेलद्वारे धमकी देण्यात आली. शाळेत स्फोटके ठेवल्याचा आणि त्यातून मोठी जीवितहानी करण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन तपासणी केली. बॉम्ब शोधक पथकानेशाळा सुरक्षित असल्याची खात्री केली असून धमकी देणाऱ्याचा शोध सायबर पोलिसांच्या मदतीने सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सिटी इंटरनॅशनल स्कूल, औंध या शाळेला एक धमकीचा ईमेल आला. शाळेच्या ईमेल आयडीवर हा मेल आला होता. मेलमध्ये लिहिले होते, “शाळेच्या परिसरात शक्तिशाली स्फोटके ठेवले आहेत. सकाळी इमारत रिकामी करा, अन्यथा आत असलेल्या लोकांचे मृत्यू होतील, हात-पाय उडतील किंवा डोकीही उडतील. आम्ही ‘रोडकिल’ आणि ‘क्यो’ या दहशतवादी संघटनेचे सदस्य आहोत. हा मेसेज मीडिया हाऊसना द्या,” असा उल्लेख सदर मेलमध्ये करण्यात आला होता.धमकीचा मेल पाहताच प्राचार्या अपूर्वा पाटील यांनी तात्काळ चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याला याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून त्वरित कार्यवाही केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ATC आणि गुप्तचर विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. बॉम्ब शोधक आणि निकामी पथकाला देखील बोलावण्यात आले. डिओ सातपुते यांच्या नेतृत्वाखाली बॉम्ब शोधक पथकाने शाळेची कसून तपासणी केली.तपासणीनंतर शाळेत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही.

त्यामुळे बॉम्ब शोधक पथकाने लेखी स्वरूपात शाळा सुरक्षित असल्याचं प्रमाणपत्र दिलं. या कारवाईसाठी पोलीस स्टेशनमधील 2 अधिकारी आणि 12 कर्मचारी तैनात होते. चतु:श्रृंगी पोलिसांनी परिसरातील इतर शाळांनाही सतर्क केले. डीएव्ही पब्लिक स्कूल, औंध आणि लॉयला स्कूल, पाषाण रोड या शाळांना भेट देऊन आवश्यक सूचना देण्यात आल्या.पोलिसांनी धमकीचा मेल कुठून आला याचा तपास सुरू केला आहे. “roadkillkyo” नावाच्या मेल आयडीवरून हा मेल पाठवण्यात आला होता. सायबर विभागाच्या मदतीने या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मेल पाठवणारे कोण आहेत आणि त्यांचा उद्देश काय आहे, याचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे शाळेत काही काळ तणावाचे वातावरण होते. परंतु, शाळा प्रशासन आणि पोलिसांनी तातडीने घेतलेल्या भूमिकेमुळे कोणतीही दुर्घटना घडली नाही. परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.