कोकणातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर राजकारण तापलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूणमध्ये शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात वाद पेटला आहे.कोकणातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वीच राजकीय वातावरण तापू लागले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूणच्या राजकारणावरून शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) खडाजंगी सुरू झाली आहे. मंत्री उदय सामंत यांनी राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांच्या विरोधात प्रशांत यादव यांना पक्षात येण्याचे निमंत्रण दिले. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी शिंदे गटाच्या नेत्यांना खडे बोल सुनावले. या सगळ्यामुळे निवडणुकीआधीच राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. कार्यकर्ते आणि नेत्यांच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. रत्नागिरीजिल्ह्यातील चिपळूणच्या राजकारणामुळे अजितदादांची राष्ट्रवादी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये वाद सुरू झाला आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी थेट अजितदादांचे समर्थक आमदार शेखर निकम यांच्या विरोधात निवडणूक लढवलेले प्रशांत यादव यांना भेटून त्यांना शिवसेनेत येण्याचे निमंत्रण दिले. प्रशांत यादव हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत.विधानसभा निवडणुकीच्या वेळी उदय सामंत यांच्यावर टीका करणाऱ्या अजित यशवंतराव यांना राष्ट्रवादीत प्रवेश देण्यात आला. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. यावरून पत्रकारांनी उदय सामंत यांना प्रश्न विचारले. या प्रश्नांना उत्तर देताना सामंत यांनी चिपळूण दौऱ्यात अजितदादांच्या राष्ट्रवादीला खडे बोल सुनावले. त्यांनी अप्रत्यक्षपणे आमदार शेखर निकम यांना लक्ष्य केले.









