बाबा! मला पावसात जाऊ दे; लेकराचा हट्ट अन् त्याच्यातील राक्षस जागा झाला, किचनमध्ये गेला…

 एका वडिलांनी आपल्याच दहा वर्षांच्या मुलाची हत्या केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे.एका पित्याने आपल्याच दहा वर्षांच्या लेकराची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीतील सागरपूर भागात ही भयंकर घटना घडली आहे. शनिवारी दुपारी 1:30 वाजताच्या सुमारास या बापाने आपल्या 10 वर्षांच्या मुलाला संपवलं. पावसात खेळायला जाण्याचा हट्ट करत असल्याने या बापाने मुलाला मारलं. पोलिसांनी आरोपी पित्याला अटक केली असून, हत्येसाठी वापरलेला चाकूही जप्त केला आहे. मुलाला रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.दिल्लीच्या सागरपूर परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. एका वडिलांनी केवळ पावसात खेळण्याची इच्छा व्यक्त केल्यामुळे आपल्या 10 वर्षांच्या मुलाची हत्या केली आहे.

शनिवारी दुपारी 1:30 च्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे.मृत मुलगा त्याचे वडील ए. रॉय (40 वर्षे) आणि त्याचे तीन भाऊ यांच्यासोबत सागरपूरमधील मोहन ब्लॉक येथे एका भाड्याच्या खोलीत राहत होता. काही वर्षांपूर्वी मुलाच्या आईचे निधन झाले होते. चार मुलांमध्ये तो तिसऱ्या नंबरचा मुलगा होता. पोलिसांनी सांगितले की, मुलगा पावसाळ्यात खेळायला जाण्याचा हट्ट करत होता. वडिलांनी त्याला नकार दिला, पण तो ऐकत नव्हता. त्यामुळे रागाच्या भरात वडिलांनी किचनमधील चाकू उचलून त्याच्या छातीत मारला.

घटनेनंतर आरोपी वडिलांनी स्वतःच मुलाला रुग्णालयात नेले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली असून हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्यात वापरलेला चाकू पोलिसांनी जप्त केला आहे.आरोपी वडील मजुरीचे काम करतात आणि कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे. अनेक स्थानिक लोक आरोपी वडिलांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. एका वडिलांनी क्षुल्लक कारणावरून आपल्या मुलाची हत्या करावी, यावर कोणाचाही विश्वास बसत नाही.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.