पुनर्विकासात युतीचा ‘खो’? एसटीच्या जागा भाडेतत्वावर देण्यास मंत्रिमंडळ उदासीन, प्रक्रियेला खीळ.

राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ‘एसटी’ जागेच्या पुनर्विकासात भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या मंत्रिमंडळामधूनच ‘खो’ घालण्यात आल्याची बाब समोर येत आहे. यामुळे राज्यातील १६२ जागांच्या पुनर्विकासाच्या प्रक्रियेला खीळ बसली आहे. राज्याचे परिवहनमंत्री आणि राज्य परिवहन (एसटी) महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ‘एसटी’ जागेच्या पुनर्विकासात भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या मंत्रिमंडळामधूनच ‘खो’ घालण्यात आल्याची बाब समोर येत आहे. एसटीच्या जागेचा भाडेकरार ६० वर्षांवरून ९९ वर्षे करण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मान्यता मिळालेली नाही. यामुळे राज्यातील १६२ जागांच्या पुनर्विकासाच्या प्रक्रियेला खीळ बसली आहे.
एसटीच्या श्वेतपत्रिकेत सन २०२३-२४पर्यंत १०,३२२.३२ कोटी रुपयांचा संचित तोटा असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

राज्याच्या अर्थ विभागाकडून महामंडळाला सवलतीची प्रतिपूर्ती आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी निधी पुरवण्यात येतो. एसटीला स्वयंअर्थपूर्ण करण्यासाठी ‘बांधा वापरा आणि हस्तांतरित करा’ (बीओटी) आणि ‘सार्वजनिक-खासगी भागीदारी’ (पीपीपी) अशा दोन्ही पर्यायांनुसार विकास करण्यात येणार असल्याचे श्वेतपत्रिकेत स्पष्ट करण्यात आले आहे.राज्य मंत्रिमंडळाच्या २३ सप्टेंबर २०२४ रोजी झालेल्या बैठकीत एसटी महामंडळाच्या जागा व्यावसायिक विकासासाठी ‘बीओटी’ तत्त्वावर ६० वर्षांसाठी भाडेपट्ट्याने देण्यास मान्यता दिली आहे. तत्पूर्वी, महामंडळाच्या जागा ३५ वर्षांच्या कालावधीसाठी उपलब्ध होत्या. ६० वर्षांचा भाडेकरार करण्याची तयारी महामंडळाने केली, मात्र विकासकांनी एसटीच्या पुनर्विकासाकडे पाठ फिरवली होती.दरम्यान, राज्यातील ८४२ ठिकाणी तीन हजार ३६० एकर जागेचा पुनर्विकास करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे.

त्यानुसार दुसऱ्या टप्प्यातील ९० जागांची प्राथमिक यादी निश्चित करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात निश्चित झालेल्या ७२ जागांसाठी निविदाप्रक्रिया सुरू आहे, असे एसटीतील वरिष्ठ अधिकारी सांगतात.मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या ई-शिवनेरी बसमधील पूर्ण तिकीट काढणाऱ्या प्रवाशांना आरक्षण योजनेचा लाभ होणार आहे. एका प्रवाशाची पुणे-मुंबई प्रवासात ९० रुपयांची बचत होणार आहे. आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांनी प्रत्यक्ष तिकीट खिडकीवर अथवा एसटीच्या अधिकृत संकेतस्थळावर अथवा एसटीच्या मोबाइल ॲपद्वारे तिकीट आरक्षित केल्यास १५ टक्के सवलत मिळणार आहे. एसटी महामंडळाच्या वर्धापनदिनी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी कमी गर्दीच्या हंगामामध्ये लांब पल्ल्याच्या बसमधून आगाऊ आरक्षण करणाऱ्यांना तिकीट दरामध्ये १५ टक्के सूट देण्याची घोषणा केली होती. त्याची अंमलबजावणी आजपासून सुरू करण्यात आली आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.