पावसाळ्यात पुण्याच्या जंगलांमध्ये येते ‘चमकणारी पाहुणी’, जुन्नर, सासवड, बारामती, भोर, ताम्हिणी, मुळशी, सिंहगड वनक्षेत्रांचा समावेशॉ.

पुण्यात पावसाळ्यात ‘झायलेरिया हायपोक्झिलॉन’ नावाच्या चमकणाऱ्या बुरशीचे दर्शन घडते. ताम्हिणी, भीमाशंकरच्या जंगलात कुजलेल्या लाकडांवर ही बुरशी रात्री रेडियमप्रमाणे चमकते.थंडीचा हंगाम सुरू झाला, की देश-विदेशातील असंख्य पक्षी जसे पुण्यातील जलाशयांवर, रानावनांत मुक्कामाला येतात, त्याचप्रमाणे पावसाळ्याने जोर धरला, की पुण्यातील टेकड्या, लहान-मोठ्या रानावटा, अभयारण्यांमध्ये कुजलेल्या पानांवर, खोडांवर बुरशीचे अनेक प्रकार डोके वर काढतात. वनसंपदा, वन्यजीवांच्या विविधतेनेही संपन्न पुणे जिल्ह्याला बुरशी वैविध्याचाही समृद्ध वारसा लाभला आहे. या बुरशींच्या विश्वातील एक अनोखी, रात्री ‘चमकणारी पावसाळी पाहुणी’ म्हणजे ‘ झायलेरिया हायपोक्झिलॉन ‘ (बायोल्युमिनिसंट फंगी).पुणे जिल्ह्यात ताम्हिणी अभयारण्य आणि आजूबाजूचे जंगल, भीमाशंकर अभयारण्यांमध्ये पावसाळ्यामध्ये आढळणारी ही वैशिष्ट्यपूर्ण बुरशी म्हणजे सह्याद्रीचे वैभव आहे. काही वर्षांपूर्वी रेडिअमच्या काट्यांची घड्याळं, हातातले पट्टे बाजारात आले, तेव्हा लोकांना आश्चर्य वाटले; पण निसर्गाने शेकडो वर्षांपूर्वीच रेडिअमप्रमाणे चमकणाऱ्या बुरशीची निर्मिती केली.

पुणे जिल्ह्यासह महाबळेश्वर, आंबोली, कोयना आणि सह्याद्रीच्या काही वन क्षेत्रांत ती दिसते.या बुरशीच्या चमकण्यामागचे रहस्य उलगडताना पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. सचिन पुणेकर म्हणाले, पावसाळ्यामध्ये जंगलाच्या घनदाट भागांत, दाट झाडी-झुडपांच्या पायथ्याला, जमिनीवर मोठ्या प्रमाणात कुजलेल्या काड्या, पालापाचोळा साठतो. त्यावर वेगवेगळ्या प्रकरच्या बुरशी बस्तान मांडतात. मुसळधार पावसाचा जोर ओसरला, की जंगलात ठरावीक प्रमाणात आर्द्रता निर्माण होते. त्या वेळी छोट्या झुडपांच्या कुजलेल्या काड्यांवर ‘झायलेरिया हायपोक्झिलॉन’ ही बुरशी दिसायला लागते. यात प्रामुख्याने कारवीच्या किंवा दिंडा नावाच्या वनस्पतीच्या जमिनीवर पडलेल्या मृत काड्यांवर ‘झायलेरिया हायपोक्झिलॉन’ वाढते. तिची मुळे (मायसेलिया) वाढायला लागली, की हवेतील आर्द्रतेमुळे ‘लेसिफेरीन’ नावाची रसायने सक्रिय होतात. त्यातून प्रकाशाच्या स्वरूपात ऊर्जा बाहेर पडते. त्यामुळे कुजलेली काडी रात्रीच्या मिट्ट अंधरात रेडिअमप्रमाणे चमकताना दिसते.”काजव्यांमधील प्रकाश उत्सर्जनाची कार्यपद्धती; तसेच तंत्र आपल्याला या बुरशीमध्ये दिसते.

दिवसा कुजलेल्या काड्या पाहताना आपल्याला तिची कल्पनाही येत नाही. बीजाणू प्रसारण झाल्यानंतर ती हळूहळू आजूबाजूच्या परिसरातही पसरते. हवेतील आर्द्रता कमी होत गेली, की बुरशीचा हंगाम संपतो. या बुरशीचे महत्त्व ओळखून शिवकाळातील रात्रीच्या काही मोहिमांमध्ये तिचा दिशादर्शक म्हणून वापर झाल्याचे सांगितले जाते, पण पुरसे ऐतिहासिक दस्तावेज उपलब्ध नाहीत,’ असे पुणेकर यांनी सांगितले.पुणे जिल्ह्यात आत्तापर्यंत अडीचशेहून अधिक बुरशीच्या प्रजातींची नोंद झाली आहेत. ताम्हिणी, मुळशी, सिंहगड वन क्षेत्र, लोणावळ्यासह भीमाशंकर अभयारण्य, जुन्नर, सासवड, बारामतीसह अगदी भोर, वेल्ह्यातील जंगलांमध्ये आढळणाऱ्या बुरशी आणि दगडफुलांमध्ये प्रचंड विविधता आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, फर्ग्युसन कॉलेजसह प्रशस्त परिसर असलेल्या सर्व जुन्या शैक्षणिक आणि संशोधन संस्थांच्या आवारात वैशिष्ट्यपूर्ण, दुर्मीळ बुरशी आजही अस्तित्व टिकवून आहेत.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.