दुर्दैवी! बांधकामाच्या खड्ड्यात बुडून तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू; तिघांचेही नाव एकच, घटनेनं हळहळ.

 विडी कामगारनगर मधील साई गरड, साई जाधव व साई उगले हे तिघेही मित्र होते. यापैकी दोन जण आदर्श माध्यमिक विद्यालयात नववीच्या वर्गात, तर एक जण बिटको शाळेत शिक्षण घेत होताविडी कामगारनगर परिसरातील इमारत बांधकामस्थळी खोदलेल्या २० फूट खड्ड्यात तीन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. ३०) सकाळी उघडकीस आली. खड्ड्यात पावसाचे पाणी साचले असून, त्यात रविवारी सकाळी ही तीन मुले पोहायला गेली होती. साई गोरख गरड, (वय १४), साई केदारनाथ उगले (१३), साई हिलाल जाधव (१४, हे सर्व रा. विडी कामगारनगर) असे बुडून मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहे.

विडी कामगारनगर मधील साई गरड, साई जाधव व साई उगले हे तिघेही मित्र आहे. यापैकी दोन जण आदर्श माध्यमिक विद्यालयात नववीच्या वर्गात, तर एक जण बिटको शाळेत शिक्षण घेत होता. हे तिघेही रविवारी (दि. २९) सकाळपासून सोबत होते. मात्र, बराच वेळ झाल्याने ते घरी आले नाहीत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी परिसरात त्यांचा शोध घेतला. मात्र, कुठेही आढळून न आल्याने त्यांचे अपहरण झाल्याचा संशय व्यक्त करीत आडगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. मात्र, सोमवारी सकाळी तिन्ही मुलांचा शोध घेत असताना अमृतधामजवळ बांधकामाच्या ठिकाणी नातेवाइकांना खड्ड्याजवळ ओळखीच्या खुणा आढळल्या.त्या वेळी खोदकाम केलेल्या मातीच्या ढिगाऱ्याजवळ तिन्ही मुलांचे कपडे व चपला आढळल्या. या वस्तूंवरून मुले पाण्यात बुडाल्याची शंका व्यक्त झाली. अग्निशामक दलाच्या जवानांनी खड्ड्यात उतरून मुलांचे मृतदेह बाहेर काढले. या प्रकरणानंतर संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करीत विकासकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त करीत रास्ता रोको आंदोलन केले. दुर्घटना घडली त्या ठिकाणी सुरक्षारक्षक नव्हते, अशी तक्रार करतानाच संबंधित विकसकावर कडक कारवाई करण्याची मागणी करीत माजी नगरसेवक पूनम सोनवणे आणि नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. या दुर्घटनेनंतर आडगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बांधकाम विकसक आणि इतरांवरही गुन्हा दाखल करण्यात आला असून, विकसक विजय शेखलिया आणि ठेकेदार आकाश शंकर गायकवाड यांना ताब्यात घेतले आहे. महिनाभरापूर्वी अशीच एक दुर्घटना इंदिरानगर भागात घडली होती. त्यावेळी तरुणाचा बुडून मृत्यू झाला होता.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.