चक्कर येऊन पडताच शाळेने घरी पाठवलं, 11 वर्षांच्या वेदिकाचा मृत्यू, मुख्याध्यापक म्हणतात गडबडीत हॉस्पिटलला न्यायचं सुचलंच नाही.

मजुरी करणाऱ्या पालकांनी मिळेल त्या वाहनाने आटापिटा करीत वाडा ग्रामीण रुग्णालय गाठले, मात्र तोपर्यंत वेदिकाची प्राणज्योत मालवल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.जिल्ह्यात वाडा तालुक्यातील सोनाळे हायस्कूलमधील विद्यार्थिनीला चक्कर आली असताना, शिक्षकांनी तिला दवाखान्यात न नेता घरी पाठवले. त्यामुळे तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

शाळेच्या हलगर्जीमुळे मुलीचा मृत्यू झाल्याची तक्रार विद्यार्थिनीच्या पालकांनी नोंदविली असून याबाबत चौकशीची मागणी केली आहे. धक्कादायक म्हणजे, घाई गडबडीत आम्हाला विद्यार्थिनीला रुग्णालायता नेण्याचे सुचले नाही, असा हास्यास्पद दावा शाळेच्या मुख्याध्यापकांनी केला आहे.वेदिका प्रकाश झाटे, असे मयत 11 वर्षीय विद्यार्थिनीचे नाव आहे. ती इयत्ता पाचवीत शिकत होती. गुरुवारी दुपारी शाळेत तिला अचानक चक्कर आल्यामुळे ती बेशुद्ध पडली. मात्र शिक्षकांनी तिला उपचारासाठी दवाखान्यात न नेता, जवळ असलेल्या बिलघर येथील तिच्या घरी नेऊन ठेवले.मजुरी करणाऱ्या पालकांनी मिळेल त्या वाहनाने आटापिटा करीत वाडा ग्रामीण रुग्णालय गाठले, मात्र तोपर्यंत वेदिकाची प्राणज्योत मालवल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.सोनाळे येथे शाळेजवळच दवाखाना असून वेदिकाला तिथे तात्काळ उपचारासाठी नेले असते, तर तिचे प्राण वाचू शकले असते, असा दावा मुलीचे वडील प्रकाश यांनी केला. शाळेच्या हलगर्जीमुळे हा प्रकार घडल्याचा आरोप करत, या प्रकरणी चौकशीची करावी, तसेच दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी वाडा पोलिसांकडे केली आहे.दरम्यान, ‘शाळेत कुणीही आजारी असले, तर तात्काळ रुग्णालयात नेले जाते. मात्र वेदिकाच्या बाबतीत घाई गडबडीत ते आम्हाला सुचले नाही आणि आम्ही तिला घरी घेऊन गेलो,’ असे शाळेचे मुख्याध्यापक व्ही. बी. महाले यांनी सांगितले.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.