छगन भुजबळ यांनी शुक्रवारी (दि. २७) महाराष्ट्र टाइम्सच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी त्यांनी ‘मटा’च्या व्यासपीठावर दिलखुलास गप्पा करत नाशिकसह राज्यातील सध्याच्या प्रश्नांवर सडेतोड भाष्य केले.राज्यात ठाकरे बंधू, तसेच पवार कुटुंब एकत्र यावेत ही महाराष्ट्रातील जनतेची इच्छा आहे. दोन्ही कुटुंबांच्या एकत्रीकरणासाठी आधीही प्रयत्नही झालेत. परंतु, ठाकरे बंधू आणि पवार कुटुंब एकत्र येणे कठीण असल्याचे विधान अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. सिनेमा आणि मालिकांमुळे हिंदी आधीच घराघरात पोहचली आहे. त्यामुळे पहिलीपासून हिंदीच्या सक्तीला विरोध करीत, पहिलीच्या मुलांवर तीन भाषांचे ओझे कशाला, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. राज्यात पहिलीपासून हिंदीची सक्ती होईल, असे वाटत नाही असे स्पष्ट मतही भुजबळांनी ‘मटा’च्या व्यासपीठावर व्यक्त केले.










