काही समजायच्या आत अंधारात जीवघेणा हल्ला, उमेशचा जागीच मृत्यू, सांगलीत काय घडलं?

सांगली जिल्ह्यातील कुपवाड एमआयडीसीमध्ये एका तरुणाचा खून झाला. उमेश पाटील नावाच्या युवकाला प्रेमप्रकरणातून मारण्यात आले. हल्लेखोरांनी लोखंडी रॉडने डोक्यात वार केले. पोलिसांनी दोघा संशयितांना अटक केली आहे.कुपवाड एमआयडीसी मधील नटराज कंपनी जवळ रस्त्यालगत शुक्रवारी रात्री प्रेम प्रकरणाच्या कारणावरून एका युवकाच्या डोक्यात लोखंडी रॉडने वर्मी घाव घालून खून केल्याची घटना घडली. उमेश मच्छिंद्र पाटील असे मयत तरुणाचे नाव आहे. घटनेनंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केले. याबाबत महेश मच्छिंद्र पाटील यांनी पोलिसात फिर्याद दिली.

कुपवाड एमआयडीसी पोलिस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तपासाची चक्रे गतीने फिरवत दोघा जणांना अटक केली. साहिल उर्फ सुमित मधुकर खिलारे, मॉडेल सोन्या उर्फ अथर्व किशोर शिंदे अशी अटक केलेल्या संशयितांचे नावे आहेत. एम आय डी सी मधील एका पुठ्याच्या कारखान्यात मयत उमेश पाटील आणि अथर्व उर्फ सोन्या शिंदे हे कामाला होते. शुक्रवारी रात्री पावणेदहाच्या दरम्यान नटराज कंपनी जवळ रस्त्यालगत अंधाराचा फायदा घेत संशयित सोन्या आणि त्याच्या साथीदार हल्लेखोरांनी प्रेमप्रकरणाच्या कारणावरून उमेश पाटील यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने वर्मी घाव घातले. वर्मी घाव बसल्याने गंभीर जखमी अवस्थेत उमेश रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसतात हल्लेखोरांनी पलायन केले. सांगलीमध्ये य घटनेने खळबळ उडाली आहे.घटनेची माहिती मिळताच कुपवाड एम आय डी सी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या उमेश पाटील याला आयुष्य हेल्पलाइन टीमच्या रुग्णगवाहिकेतून शासकीय दवाखान्यात दाखल केले. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. घटनेची माहिती मिळताच मिरजेचे पोलीस उपविभागीय अधिकारी प्रणिल गिल्डा यांनी घटनास्थळाला भेट देऊन तपासाच्या अनुषंगाने सूचना केल्या.कुपवाड पोलिस ठाण्याचे प्रभारी दीपक भांडवलकर व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सतीश शिंदे यांच्या पथकाने तपासाची चक्रे गतीने फिरवत अवघ्या काही तासातच दोघाजणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली. संशयितांवर कुपवाड पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला. प्रेमप्रकरणातून खून झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.