माझ्या मुलीची हत्या…; कीर्तनकार संगिताताई खून प्रकरणात धक्कादायक माहिती; वडिलांनी सगळं सांगितलं.

वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव येथे आश्रमात राहणाऱ्या महिला कीर्तनकाराची जमिनीच्या वादातून हत्या करण्यात आली. शेजारील कुटुंबाने वाळू आणल्याच्या कारणावरून वाद घातला होता, अशी माहिती वडिलांनी दिली. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती, त्यानुसार पोलिसांनी चार संशयित आरोपींना अटक केली असून कसून चौकशी सुरू आहे. वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव शिवारातील आश्रमात राहणाऱ्या महिला कीर्तनकाराची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. ही हत्या जमिनीच्या वादातून झाल्याचं स्पष्ट झालं आहे. आश्रम बांधण्यासाठी वाळू आणली असता शेजारच्या कुटुंबाने वाद घालत शिवीगाळ केली होती.

या प्रकरणी विरगाव पोलीस ठाण्यात तक्रार देखील दिली असल्याचं मयत कीर्तनकाराचे वडील अण्णासाहेब पवार यांनी सांगितले. या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून कडक शिक्षा द्या, अशी मागणी देखील पवार यांनी केली.वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव येथील प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. संगीताताई पवार यांची शुक्रवारी रात्री दगडाने ठेचून हत्या झाली. मोहटादेवी मंदिराचे पुजारी शिवाजी चौधरी आश्रम परिसरात आले. त्यावेळी आश्रमाचे कुलूप गेट तोडलेले दिसले. त्यांनी आत जाऊन प्रवेश केला असता संगीताताई रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या. घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर अधिकारी कर्मचारी श्वान पथकासह घटनास्थळी दाखल झाले.कीर्तनकार संगीता पवार यांच्या हत्येने राज्यभरात एकच खळबळ उडाली. ही हत्या कोणी व का केली असे प्रश्न निर्माण झाले असताना मृत कीर्तनकाराचे वडील अण्णासाहेब पवार यांनी प्रतिक्रिया दिली. आम्ही 2007 मध्ये चिंचडगाव मध्ये दीड एकर जमीन घेतली. तेव्हापासून शेजारचं कुटुंब आमच्याशी वाद घालत होते. त्यानंतर ही जमीन मी मुलगी संगीता हिला दिली. संगीता या जमिनीवर आश्रम बांधणार होती. त्यासाठी जमिनीवर वाळू आणण्यात आली. यावेळी शेजारील कुटुंबाने वाद घातला. 14 एप्रिल रोजी विरगाव पोलीस ठाण्यात शेजारच्या चौधरी कुटुंबाच्या विरोधात तक्रार दिली. माझ्या मुलीला धोका असल्याचा देखील उल्लेख केला होता. त्यानंतर माझ्या मुलीची हत्या झाल्याचं वडील अण्णासाहेब पवार म्हणाले.
दरम्यान, मृताच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार देखील पोलीस तपास करत असून या प्रकरणांमध्ये चार संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून पोलीस त्यांची कसून चौकशी करत आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील यामध्ये स्वतः लक्ष घालून आरोपीचा शोध घेत आहेत.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.