पत्नीला मारहाण, फरफटत गॅलरीत नेलं, ढकलून देणार तेवढ्यात…, पतीसह अख्खं कुटुंब फरार, पुण्यात काय घडलं?

 एप्रिल २०२३मध्ये तिचा विवाह मोठ्या थाटात झाला होता. वडिलांनी २५ लाख रुपयांचा खर्च करून रोख रक्कम, दागिने व गृहोपयोगी वस्तू दिल्या. मात्र, विवाहानंतर काही महिन्यांतच तिच्यावर अत्याचार सुरू झाले.सासरच्या मंडळींना सुमारे ५० लाख रुपयांची मदत दिल्यानंतरही विवाहितेवर सतत अत्याचार करून, तिला घरातून गॅलरीतून ढकलून देऊन खून करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. वडगाव शेरीतील सिलिकॉन बे सोसायटीत हा प्रकार घडला.

चंदननगर पोलिसांनी पतीसह सहा जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.२४ वर्षीय विवाहितेने चंदननगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पती प्रणील निकुडे (३२), सासरे उदय निकुडे (६०), सासू वैशाली निकुडे (५५), दीर प्रतीक निकुडे (३०), चुलत सासरे माणिक निकुडे आणि त्यांचा मुलगा प्रमोद निकुडे (सर्व रा. वडगाव शेरी व कल्याणीनगर) अशी आरोपींची नावे असून, ते सर्व सध्या फरारी आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल २०२३मध्ये तिचा विवाह मोठ्या थाटात झाला होता. वडिलांनी २५ लाख रुपयांचा खर्च करून रोख रक्कम, दागिने व गृहोपयोगी वस्तू दिल्या. मात्र, विवाहानंतर काही महिन्यांतच तिच्यावर अत्याचार सुरू झाले. त्यानंतर वडिलांनी नातेवाइकांकडून उसने पैसे घेऊन सासरकडील मंडळींना वेळोवेळी ५० लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत केली; तरीही तिचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरूच राहिला.२७ मे २०२५ रोजी पतीने तिचा गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर २५ जून रोजी रात्री साडेअकरा वाजता, ‘मोमोज’ची ऑर्डर देत असताना किरकोळ कारणावरून वाद झाला. आरोपी पतीने तिचे डोके कपाटावर आपटले, केस उपटले आणि फोन फोडला. त्यानंतर जबरदस्तीने गॅलरीकडे ओढून नेऊन ढकलून देण्याचा प्रयत्न केला.विवाहितेचा आरडाओरडा ऐकून सोसायटीचा वॉचमन आणि काही रहिवाशांनी खाली आवाज दिला. त्यामुळे तिचे प्राण वाचले. वॉचमनने तिच्या वडिलांना फोन करून बोलावले. ते मध्यरात्री सव्वाबारा वाजता पोहोचले आणि पीडितेला सोबत घेऊन गेले. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ निरीक्षक सीमा ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पथके करीत आहेत. सोसायटीतील वॉचमन व रहिवाशांचे जबाब नोंदवले जात आहेत.गुन्हा घडल्यानंतर आरोपीचे कुटुंबीय पसार झाले. त्यांचा शोध घेतला जात आहे. त्यासाठी तीन पथके नेमली आहेत.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.