नियम फक्त सर्वसामान्यांसाठीच? पंढरपूरमध्ये VIP दर्शनावर बंदी असताना शिंदेंच्या आमदाराकडून सोय करण्याची मागणी.

हिंगोलीच्या शिंदेंच्या आमदाराने आपल्या २१ कार्यकर्त्यांसाठी व्हीआयपी दर्शनाची मागणी केली. यासाठी त्यांनी पंढरपूर देवस्थान समितीला पत्र दिलं. आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी आहे. त्यात सामान्य नागरिक तासनतास रांगेत उभे आहेत. अशा स्थितीत आमदारांनी व्हीआयपी दर्शनाची मागणी केल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

“टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटती चालावी पंढरीची” विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने मजल दर मजल करत भाविक दिंडीमधून विठुरायाच्या दर्शनाची आस घेऊन वारीतून पंढरपूर गाठतात. पांडुरंगाच्या चरणी आपला माथा कधी टेकतो याची आस वारकऱ्यांना लागली आहे. डोळे भरून पांडुरंगाच सोज्वळ रूप बघायला मिळतेय म्हणून तळमळ सुरू असून लाखो भाविक पंढरीच्या रस्त्यावर बघायला मिळत आहेत. अशात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आणि पालकमंत्र्यांच्या स्पष्ट आदेशानंतर पंढरपुरातील पांडुरंगाच्या मंदिरात व्हीआयपी दर्शन बंदी करण्यात आली आहे. मात्र काही राजकीय नेते मंडळी या नियमांच उल्लंघन करताना दिसत आहेत.यातच हिंगोलीच्या कळमनुरी मतदार संघाचे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी आपल्या २१ कार्यकर्त्यांना व्हीआयपी दर्शन मिळावं यासाठी पंढरपूर विठ्ठल देवस्थानच्या समितीला पत्र दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या पत्रात असा उल्लेख करण्यात आला आहे की, माझे मोठे बंधू श्रीराम लक्ष्मणराव बांगर आणि काही नगरसेवक व शिवसेना कार्यकर्ते हे श्रींच्या दर्शनाकरता येणार आहेत. यामध्ये २१ जणांची नावं आहेत. पंढरपूर मंदिर समितीने या सर्वांची दर्शनाची व्यवस्था करावी अशी पत्राद्वारे विनंती केली आहे.आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरात मानाच्या पालख्यासह लाखो भाविक दर्शनाला दाखल होत आहेत. यामुळे दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून सध्या दर्शनाची रांग गोपाळपूर येथील बाराव्या पत्रा शेडच्या पुढे गेल्याचं सांगितलं जात आहे. तर दर्शन रांगेमध्ये सध्या तब्बल एक लाखाच्या वर भाविक रांगेमध्ये उभे आहेत. विठुरायाच्या दर्शनासाठी इतकी मोठी रांग असतानाही आमदार बांगर यांनी थेट पंढरपूर देवस्थानला पत्र देऊन २१ जणांची व्हीआयपी नावाची यादी देऊन त्यांच्या दर्शनाची व्यवस्था करण्याचा आग्रह धरला आहे, यामुळे राजकीय नेत्यांचा आग्रह कुठेतरी मंदिर समितीला पेच निर्माण करताना दिसत आहेत.एकीकडे भाविक तासनतास रांगेत उभे आहेत, तर दुसरीकडे कार्यकर्त्यांना व्हीआयपी दर्शन मिळावं म्हणून आमदार प्रयत्न करत असल्याचं दिसून आलं आहे यामुळे सामान्य भाविकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.