शरीरावर दातांच्या खुणा, जबरदस्ती संबंध; कोलकाता पीडितेच्या मेडिकल रिपोर्टमध्ये धक्कादायक माहिती.

कोलकाता शहरातल्या लॉ कॉलेजमध्ये एका विद्यार्थिनीवर भयानक सामूहिक अत्याचार झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे. पीडितेच्या वैद्यकीय तपासात अत्याचाराची पुष्टी झाली आहे.साऊथ कोलकाता लॉ कॉलेजमध्ये एका विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक अत्याचारामुळे एकच खळबळ उडाली आहे. 24 वर्षीय विद्यार्थिनीने कॉलेजमधील माजी विद्यार्थी आणि दोन विद्यार्थ्यांवर अत्याचाराचा आरोप केला आहे. पोलिसांनी तीनही आरोपींना अटक केली असून, पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. ज्याचा अत्यंत धक्कादायक अहवाल आता समोर आला आहे. या घटनेमुळे राजकीय वातावरणही तापले असून, दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, वैद्यकीय तपासणीत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करणे, शरीरावर चाव्याचे आणि नखांचे व्रण आढळून आले आहेत. मुख्य आरोपी कॉलेजचा माजी विद्यार्थी असून तो वकिली करतो, त्याने अत्याचार केला आणि तर इतर दोघे बाहेर पहारा देत होते, असंही पोलिसांनी सांगितले.या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. कोलकाता पोलीस आयुक्त मनोज वर्मा आणि संयुक्त सीपी (गुन्हे) रूपेश कुमार यांनी कसबा पोलीस स्टेशनला भेट देऊन तपासकार्याची पाहणी केली. त्यांनी साऊथ कलकत्ता लॉ कॉलेजला भेट देऊन प्रकरणाची सखोल चौकशी केली.राज्य सरकारनेही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

पश्चिम बंगालच्या मंत्री शशी पंजा यांनी सांगितले की, पोलिसांना तक्रार मिळताच 12 तासांच्या आत तीनही आरोपींना अटक करण्यात आली. पीडितेचा जबाब नोंदवण्यात आला आहे आणि तिच्यावर उपचार सुरू आहेत. राज्य सरकार आणि पोलीस हे प्रकरण खूप गांभीर्याने घेत आहेत आणि अशा प्रकरणांमध्ये कोणतेही राजकारण होऊ नये, असंही त्या म्हणाल्या. तसेच, आरोपींचा कोणतंही नाव, धर्म, जात किंवा संघटना असली तरीही कायदा सर्वांसाठी समान आहे. ज्या आरोपींना टीएमसी छात्र परिषदेशी जोडले जात आहे ते सध्या कोणत्याही अधिकृत संघटनेशी संबंधित नाहीत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.