सिंहगड रोडवर भरधाव ट्रकची धडक, कॉलेजला जाताना सई भागवतचा हृदयद्रावक अंत, पुण्यात हळहळ.

सई स. प. महाविद्यालयात कला शाखेत दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती. गुरुवारी दुपारी ती दुचाकीने घरी जात असताना भरधाव ट्रकने तिला जोरात धडक दिलीभरधाव ट्रकच्या धडकेत महाविद्यालयीन युवतीचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सिंहगड रस्ता परिसरातील तुकाईनगर येथे घडली. सई श्रीकांत भागवत, वय 19 वर्ष, रा. तुकाईनगर, वडगाव बुद्रुक, असे मृत तरुणीचे नाव आहे.सई स. प. महाविद्यालयात कला शाखेत दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती. गुरुवारी दुपारी ती दुचाकीने घरी जात असताना भरधाव ट्रकने तिला जोरात धडक दिली. या धडकेत तिच्या डोक्याला गंभीर इजा झाली. तिला तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आले.

मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.या प्रकरणी तिची आई दीपश्री भागवत यांनी सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर ट्रकचालक पळून गेला. घटनास्थळी सहायक पोलिस आयुक्त अजय परमार आणि वरिष्ठ निरीक्षक दिलीप दाईंगडे यांनी भेट दिली.शहरात गेल्या महिन्यांत वेगवेगळ्या भागांमध्ये 17 नागरिकांचा अशा अपघातांत मृत्यू झाला आहे. डंपर, ट्रक, सिमेंट मिक्सर अशा अवजड वाहनांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवर अशा वाहनांना बंदी असतानाही काही चालक नियम झुगारून वाहन चालवतात.दुसरीकडे, खडकीच्या सर्वत्र विहार परिसरात भरधाव टेम्पोने धडक दिल्याने दीड वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला.

आईजा शेख असे मृत बालिकेचे नाव आहे. ती घरासमोर खेळत असताना टेम्पोने तिला उडवले. तिची आई झेबा शेख यांनी खडकी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर चालक पसार झाला. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.शहरात रस्त्यावर, घरांमध्ये आणि प्रवासादरम्यान चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. स्ट्रीट क्राइमच्या या वाढत्या आलेखाला रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे. बाणेर येथील पॅनकार्ड क्लब परिसरात मध्यरात्री सव्वाबारा वाजता घडली.पादचाऱ्याला दुचाकी आडवी लावून अडवण्यात आले. त्यानंतर पाठीमागे बसलेल्या चोरट्याने पादचाऱ्याकडील आठ हजार रुपयांचा मोबाइल हिसकावून नेला. बाणेर पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.