सोनवद येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान उत्साहात संपन्न.

सोनवद येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान उत्साहात संपन्न.मा.ना.पा.मंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या उपस्थितीत जनतेच्या समस्यांचे निराकरणबाभुळगाव चमगाव अहिरे सोनवद परिसरातील नागरिकांच्या शिबिराला उत्सर्फ प्रतिसाद धरणगाव तालुका प्रतिनिधी – राजु बाविस्कर,धरणगाव : तालुक्यातील सोनवद येथे दिनांक 27 जून 2025 वार शुक्रवार रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान संपन्न झाले.महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव यांच्या 100 दिवसाच्या कृती आराखड्या अंतर्गत व जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रभर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाला उत्सर्फ प्रतिसाद मिळत आहे. सोनवद येथे या अभियानाला जनतेकडून उत्सर्फ प्रतिसाद मिळाला.

या अभियानाला प्रमुख उपस्थितीत असलेले जळगाव जिल्ह्यातील माननीय पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या उपस्थितीत अभियानाला सुरुवात झाली याप्रसंगी शासनाच्या विविध योजनेविषयी माहिती देऊन जनतेच्या समस्यांचे निवारण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमास सर्व शासकीय विभाग प्रमुख हे उपस्थित होते. या अभियानात जिवंत सातबारा मोहीम, संजय गांधी योजना, रेशन कार्ड, पुरवठा विभागातील योजना, जेष्ठ नागरीक योजना,आरोग्य कार्ड, कृषी विभागातील योजना, गुणवंत विद्यार्थी योजना, बांधकाम कामगार योजना, इत्यादी योजनांचे प्रशस्तीपत्र लाभार्थ्यांना वाटप करून विविध शासकीय योजनांचा लाभ लाभार्थ्यांना देण्यात आला यावेळी सुमारे 550 लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनेचा लाभ या शिबिरा मार्फत देण्यात आला.

याप्रसंगी धरणगाव तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते, मंडळ अधिकारी मोहन महाजन, ग्राम महसूल अधिकारी आरिफ शेख,दीपक पाटील,राकेश पवार,तालुक्यातील मंडळ अधिकारी,ग्राम महसूल अधिकारी(तलाठी), BDO किशोर वानखेडे, निर्दोष पवार,दिलीप आण्णा धनगर, गजानन नाना पाटील इतर कार्यालयाचे अधिकारी , कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानात परिसरातील नागरिकांनी विविध योजनांच्या लाभ मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.