कोल्हापूरच्या तरुणासोबत धक्कादायक घटना, थेट 300 फूट खोल दरीत कोसळला, रुमाल ठरला कारण.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथे कोल्हापूर जिल्हा परिषदेचे कर्मचारी राजेंद्र सनगर हे कावळेसाद दरीत कोसळले आहेत. ते आपल्या मित्रांसोबत वर्षा पर्यटनासाठी आंबोली इथं आले होते.अनंत पाताडे, सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली इथं एक दुःखद घटना घडली. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे कर्मचारी राजेंद्र बाळासो सनगर (वय 45) हे वर्षा पर्यटनासाठी आले असता कावळेसाद दरीत पाय घसरून 300 फूट खोल कोसळले. दाट धुक्यामुळे बचावकार्यात अडचणी येत असल्याने, शोध मोहीम थांबवण्यात आली आहे. शनिवार सकाळपासून पुन्हा शोध सुरू करण्यात येणार आहे.

कोल्हापुरातील राजेंद्र सनगर हे त्यांच्या 14 मित्रांसोबत आंबोलीत फिरायला आले होते. ते कावळेसाद पॉईंटवर रेलिंगजवळ उभे होते. यावेळी अचानक त्यांचा पाय घसरला आणि ते दरीत पडले. रेलिंगच्या जवळ पडलेला रुमाल काढण्यासाठी पुढे गेल्याने राजेंद्र यांचा पाय घसरल्याचं सांगितलं जात आहे.या घटनेची माहिती मिळताच आंबोली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस कॉन्स्टेबल मनीष शिंदे आणि इतर कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आंबोली रेस्क्यू टीमला बोलावले. गेळे गावचे सरपंच सागर ढोकरे यांनी सांगितले की, ते सुद्धा घटनास्थळी उपस्थित होते. “काळोख आणि दाट धुक्यामुळे शुक्रवारी सायंकाळी शोध मोहीम राबवणे शक्य नव्हतं,” असं पोलिसांनी सांगितलं. त्यामुळे शोध मोहीम थांबवण्यात आली.

शनिवारी सकाळी राजेंद्र सनगर यांच्यासाठी पुन्हा शोध मोहीम सुरू होईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे. सध्या, खराब हवामानामुळे बचाव कार्यात अनेक अडचणी येत आहेत. राजेंद्र सनगर हे कोल्हापूर जिल्हा परिषदेत कर्मचारी आहेत. ते चिले कॉलनी, कोल्हापूर येथे राहतात. त्यांच्यासोबत असलेले मित्र आणि कुटुंबीय चिंतेत आहेत. या युवकासोबत आलेल्या मित्रांची चौकशी करण्यात येत असून राजेंद्र सनगर दरीत नेमके कसे कोसळले, याबाबत माहिती घेतली जात आहे, पोलीस आणि रेस्क्यू टीम त्यांना शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.