१ ऑक्टोबर रोजी पर्यटकांसाठी कोअर झोनमधील सफारी सुरू होणार असल्याने नवीन हंगामापासून हे दर लागू होतील. बफर झोन मधील सफारीदेखील महागली आहे.राष्ट्रीयच नव्हे, तर आंतरराष्ट्रीयस्तरावर प्रख्यात असणाऱ्या ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील सफारी महागली आहे. प्रकल्पातील बफर आणि कोअर झोनमध्ये सफारी करणाऱ्या पर्यटकांना हजार रुपयांचे अतिरिक्त शुल्क मोजावे लागणार आहे. दरम्यान, ताडोबा व्याघ्रप्रकल्पातील कोअर क्षेत्रात पर्यटकांसाठी सफारी येत्या १ जुलैपासून बंद होणार आहे. मात्र बफर झोनमध्ये मान्सून पर्यटन सुरू राहणार आहे.
नव्या रचनेनुसार, कोअर झोनमध्ये एक सफारी आता आठवड्याच्या इतर दिवशी ८ हजार ८०० रुपये, आठवड्याच्या शेवटी शनिवार व रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी १२ हजार ८०० असेल. बुकिंग ६० ते १२० दिवस आधी करावे लागणार आहे. त्याचप्रमाणे सफारीच्या एक ते ५९ दिवसांपर्यंत बुकिंग केल्यास, आठवड्याच्या दिवशी ५ हजार ८०० आणि आठवड्याच्या शेवटी ६ हजार ८०० खर्च येईल.१ ऑक्टोबर रोजी पर्यटकांसाठी कोअर झोनमधील सफारी सुरू होणार असल्याने नवीन हंगामापासून हे दर लागू होतील. बफर झोन मधील सफारीदेखील महागली आहे. ही वाढ १ जुलैपासून लागू होणार आहे. आठवड्याच्या दिवशी शुल्क सहा हजार रुपये आणि आठवड्याच्या शेवटी शनिवार व रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सात हजार रुपये झाले आहे. रिसॉर्ट मालक आणि मार्गदर्शकांनी अचानक झालेल्या वाढीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.









