पाण्याचा कॉक बंद करण्यासाठी छतावर गेली अन् अनर्थ घडला, चौथ्या मजल्यावरुन पडून तरुणीचा करुण अंत.

रायगडमध्ये एका 20 वर्षीय तरुणीचा चौथ्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला आहे. ती छतावर पाण्याच्या कॉक बंद करण्यासाठी गेल्याची माहिती आहे.इमारतीच्या छतावरुन कोसळून एका 20 वर्षांच्या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रायगड जिल्ह्यातील महाड शहरातील काकरतळे परिसरात असलेल्या समर्थ रामदास सहकारी गृहनिर्माण सोसायटीच्या चार मजली इमारतीच्या छतावरून कोसळून या वीस वर्षीय युवतीचा दुर्देवी मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे. याबाबतची नोंद महाड शहर पोलीस ठाण्यात घेण्यात आली आहे.

एका तरुणीचा इमारतीच्या छतावरून पडून मृत्यू झाल्याने परिसरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, महाड शहरातील काकरतळे परिसरात असलेल्या समर्थ रामदास सहकारी गृहनिर्माण सोसायटीमध्ये रिया किशोर चौधरी वय (वय 20 वर्षे, समर्थ रामदास अपार्टमेंट उभा मारोती मंदीर शेजारी महाड) ही तरुणी राहत होती. 26 जून 2025 रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास रिया चौधरी ही तरुणी इमारतीमध्ये येणारे बोरींगच्या पाण्याचा जल वहिनीचा कॉक बंद करण्यसाठी इमारतीच्या छतावर गेली होती.त्यावेळी रिया हिचा तोल गेला आणि ती इमारतीच्या छतावरून खाली डकमध्ये पडली. यामध्ये तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती कळताच कुटुंबाने तिला तातडीने महाड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत उशीर झालेला होता. महाड ग्रामीण रुग्णालयात कर्तव्यावर असलेले वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रिया चौधरी हिला तपासून मृत घोषित केले.रिया चौधरी ही इमारतीवरून पडल्याने तिच्या डोक्याला लागून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने तरुणीचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर सर्व गोष्टी उघड होतील. अशी माहिती महाड शहर पोलीस ठाण्याकडून प्राप्त झाली आहे.या घटनेची माहिती महाड शहर पोलीस ठाण्यात भावेश रमेश मोरे(वय 45 वर्षे, समर्थ रामदास अपार्टमेंट उभा मारोती मंदीर शेजारी महाड) यांनी दिली असून याबाबत महाड शहर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यू म्हणून या घटनेची नोंद करण्यात आली. याप्रकरणाचा अधिक तपास पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मोहिते करीत आहेत.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.