ना मुंबई, ना पुणे-नागपूर; महाराष्ट्रातील हे छोटंसं ठिकाण स्टील उत्पादनात नंबर १, नाव ऐकून आश्चर्य वाटेल.

जालना शहर ‘स्टील सिटी’ म्हणून ओळखलं जातं, जिथे बांधकाम क्षेत्रासाठी लागणारं स्टील जगभर निर्यात होतं. ७०च्या दशकात पहिला स्टील उद्योग सुरू झाला. तेव्हापासून आजपर्यंत जालना स्टील उद्योगात जागतिक स्तरावर प्रसिद्ध झाले आहे.जालना शहराची ओळख आता जगभर स्टील सिटी म्हणून होत आहे. बांधकाम व्यावसायासाठी वापरलं जाणारं स्टील हे जालना शहरातून जगभरात निर्यात केलं जातं. शिक्षण, सिंचन, आरोग्य विषयक बाबतीत जालना जिल्हा हा मागास समजला जात असला, तरी स्टील उद्योगामुळे जालना सोने का पालना, म्हणून ओळखला जातो.जालन्यामध्ये स्टील इंडस्ट्रीची सुरुवात झाली ७० च्या दशकात. १९७० च्या काळात शहरातील उद्योजकांना स्टील उद्योगात व्हिजन दिसलं, अन् त्यामुळेच जालना शहर स्टील उद्योगात उभं राहू शकलं. १९७१ मध्ये इंदिरा गांधींच्या रोटी, कपडा और मकान या त्रिसूत्रीला लक्षात घेऊन तत्कालीन जिल्हा उद्योग केंद्राच्या अधिकाऱ्यांनी जालन्यात दौरा केला होता. या दौऱ्याच्या दरम्यान एका महिन्यात दोन लाख रुपये गुंतवणूक करून स्टील उद्योग उभारता येईल का? यावर चर्चा करण्यात आली.तेव्हा शांतीलाल पित्ती यांनी हा स्टील उद्योग उभारण्याची जोखीम उचलली होती. शांतीलाल पित्ती यांच्या घरची परिस्थिती चांगली होती. शांतीलाल पित्ती यांचे वडील भोलाराम पित्ती हे स्वातंत्र्यपूर्व काळापासून भारतात राहत होते. या परिवाराचा ‘जालना ट्रान्सपोर्ट’ नावाने वाहतुकीचा व्यवसाय होता. जवळपास १६ ट्रक त्यांच्याकडे होते.

त्यामुळे त्यांना २ लाख रुपये उभारायला जास्त अडचण आली नाही आणि त्यांना स्टील उद्योग उभारण्याचा परवाना मिळाला. त्यांनी जालना- औरंगाबाद महामार्गावर असलेल्या भागात आपला पहिला स्टील उद्योग उभारला.स्टील उद्योगात पित्ती यांना यश मिळत असल्याचं बघून इतर उद्योजकांनी स्टील कारखाने सुरू केले. पित्ती या क्षेत्रात उतरले तेव्हा कोळशाच्या छोट्या भट्टीवर लोखंड वितळवलं जात होतं. त्यापासून मग नांगराचा फाळ वगैरे तयार केला जायचा. शांतीलाल पित्ती यांनी लोखंड गाळणारे, त्याचा रस करून मोल्डिंग करणारे असे कारागीर पंजाबमधून आणले होते. व्यवसाय उभा करण्यासाठी लागणारं सर्व भांडवल पंजाबमधून त्यांनी आयात केलं. १९८० च्या दशकात इलेक्ट्रिक भट्ट्या या क्षेत्रात आल्या, ज्याला फर्नेस असं म्हटलं जातं. मग विजेच्या आधारे लोखंड वितळवण्याची प्रक्रिया सुरु झाली. याने उत्पादनक्षमता अचानक वाढली. १९८० ते ९०च्या दशकात मोठ्या प्रमाणात या स्टील उद्योगाने जालन्यात जम बसवण्यास सुरुवात केली. या काळात जालना शहरातील अतिरिक्त औद्योगिक वसाहतीत ४० स्टील कारखाने होते.दरम्यानच्या काळात कामगार – मालक संघर्ष, पाणी टंचाई, वीज, आर्थिक अडचणींमुळे २० स्टील कारखाने बंद पडले. १९९० च्या दशकात जालन्यात पहिल्यांदा TMT ही जर्मन टेक्नॉलॉजी आली. यामुळे सळ्या तयार करताना लोखंड कमी प्रमाणात वापरलं जाऊ लागलं, शिवाय गुणवत्ता देखील वाढली. म्हणून त्याची मागणी वाढली.स्टील उद्योग क्षेत्रात आलेल्या नवीन पिढीने नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत स्टील उद्योग विकसितच केला नाही, तर जगाच्या पाठीवर जालना शहराचं नाव कोरलं. जालना शहरातील पोलाद, एसआरजी, कालिंका, मेटारोल,राजूरी आदी स्टील कारखाने दररोज लाखो टन स्टील उत्पादन करीत असून त्यांच्या स्टीलच्या उत्पादनास जगभरात मागणी आहे. जालना शहर हे भारतात मध्यवर्ती ठिकाण असल्याने देशातील कानाकोपऱ्यात जालना शहरातील स्टील हे पोहचवले जात आहे.विकासात मागे असलेला जालना जिल्हा स्टील उद्योग क्षेत्रात मात्र पुढे आला असून याच स्टील उद्योगाच्या माध्यमातून सरकारच्या तिजोरीत मोठा महसूल कर रूपाने जमा होत आहे. सामाजिक – धार्मिक, शैक्षणिक कार्यात हे स्टील उद्योग सातत्याने पुढे येत आहेत. स्टील उद्योग क्षेत्रातील उद्योजक मंडळींच्या समस्या आणि अडचणी शासनदरबारी दूर झाल्यास बियाणांची पंढरी पाठोपाठ जालना शहर हे स्टील पंढरी म्हणून ओळखलं जाईल, यात शंकाच नाही. जालना शहरातील स्टील हे जगात भारी हे निश्चित.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.