प्रसिद्ध कॉलेजच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार; 3 अटकेत, एकाचं राजकीय कनेक्शन.

कोलकाता येथील साऊथ कोलकाता लॉ कॉलेजमध्ये एका विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहेकोलकाता: पश्चिम बंगालच्या राजधानीत सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. कोलकात्यामधील प्रतिष्ठित साऊथ कोलकाता लॉ कॉलेजात घडलेली धक्कादायक घटना उजेडात आलेली आहे.

२५ जूनच्या रात्री कॉलेजच्या परिसरात विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीनंतर कसबा ठाण्याच्या पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींमधील एक माजी विद्यार्थी/कर्मचारी आहे. तर तो विद्यमान विद्यार्थी आहेत. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे.सामूहिक बलात्काराची घटना २५ जून २०२५ च्या रात्री घडली. कॉलेजच्या परिसरात संध्याकाळी ७.३० ते रात्री १०.५० च्या दरम्यान सामूहिक अत्याचार झाल्याची माहिती पीडितेनं पोलीस तक्रारीत नमूद केलं आहे. या प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींना अटक केलेली आहे. मणोजित मिश्रा (वय ३१ वर्षे) असं पहिल्या आरोपीचं नाव आहे. तो कॉलेजचा माजी विद्यार्थी असून कोलकाता तृणमूल छात्र परिषदेचा विद्यमान जिल्हा महासचिव आहे. त्याचे सत्ताधारी तृणमूल काँग्रेसशी थेट संबंध असल्याची माहिती पुढे आलेली आहे. तर दुसरा आरोपी पहिल्या वर्षात शिकतो. जैब अहमद (वय १९ वर्षे) असं त्याचं नाव आहे. तर तिसरा आरोपी २० वर्षांचा असून त्याचं नाव प्रमित मुखर्जी असं आहे.कसबा पोलीस ठाण्याच्या पथकांनी २ आरोपींना तालबगान क्रॉसिंगजवळ असलेल्या सिद्धार्थ शिशु रॉय उद्यानाजवळून अटक केली. तर तिसऱ्या आरोपीला त्याच्या घरातून बेड्या ठोकण्यात आल्या. तिन्ही आरोपींचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. त्यांच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक पुरावे गोळा करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. या घटनेवर लॉ कॉलेजच्या प्रशासनानं अद्याप तरी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.