छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान कानळदा येथे शिबीर ; २३७१ लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ.

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान कानळदा येथे शिबीर ; २३७१ लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ.महसूल विभागाच्या पुढाकाराने महर्षी कण्व आश्रम, कानळदा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीरात एकूण २३७१ लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला. या शिबिरात महसूल, कृषी, आरोग्य, शिक्षण, पंचायत राज, उद्योग, वन, वीज, निवडणूक व पुरवठा अशा विविध विभागांनी सहभाग घेतला.या शिबिरात उत्पन्न, जातीचे प्रमाणपत्र, जिवंत ७/१२, कालबाह्य नोंदी दुरुस्ती, निवडणूक मतदार यादीत नोंदणी, आरोग्य तपासणी, संजय गांधी योजना, घरकुल लाभार्थी, रोहयो, बियाणे व बेंग वाटप, ग्रामपंचायत जन्म-मृत्यू व विवाह दाखले इत्यादी सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. एकूण २५ विभागांमार्फत २३७१ नागरिकांना थेट लाभ मिळाला.

विशेषतः महिला बचत गटांना एकूण १ कोटी ७० लाख ५० हजार रुपयांचे धनादेश वाटप करण्यात आले. कृषी विभागाकडून ५९ प. स. लाभार्थ्यांना, वन विभागाने २४५ नागरिकांना, तर महावितरणकडून २७ लाभार्थ्यांना सेवा देण्यात आली. जिल्हा उद्योग केंद्रामार्फत ७४ लाभार्थी लाभान्वित झाले.या शिबिरात उपविभागीय अधिकारी विनय गोसावी, तहसीलदार श्रीमती शितल राजपूत, स्वामी अद्वैतानंद सरस्वती महाराज, निवासी नायब तहसीलदार प्रशांत निंबोळकर, महसूल नायब तहसीलदार राहुल वाघ, संगायो नायब तहसीलदार श्रीमती केदार, कानळदा सरपंच बापूसाहेब सपकाळे, मा. प. स. स. राजेंद्र चव्हाण, तालुका वैद्यकीय अधिकारी, आणि पंचायत समिती जळगावचे  सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती मोनाली लंगरे यांनी केले. आयोजनात कानळदा मंडळ अधिकारी श्रीमती छाया कोळी, ग्राम महसूल अधिकारी सदानंद मुंडे,  कपिल मेसेकर,  प्रशांत बडगुजर, श्रीमती मालती चाफले, महसूल सेवक विजय पाटील, निलेश भोई, श्रीमती मनिषा पाटील, मदतनीस शांताराम लंके यांचे मोलाचे सहकार्य लाभले.या शिबिरामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना विविध विभागांच्या सेवा एकाच ठिकाणी मिळाल्याने मोठा दिलासा मिळाला असून, शासनाच्या ‘दारी सरकार’ संकल्पनेची फलश्रुती जनतेपर्यंत पोहोचत असल्याचे या शिबिरातून अधोरेखित झाले.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.