विहिरीजवळील ओढणीने संशय बळावला; 45 फूट खोल कॅमेरा टाकला आणि धक्कादायक समोर; पुण्यात खळबळ.

पिंपरी-चिंचवडच्या चऱ्होलीत एका १८ वर्षीय तरुणीचा मृतदेह विहिरीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. तरुणी काही दिवसांपासून बेपत्ता होती, तिची दिघी पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली होती. तपासादरम्यान तरुणीचा मृतदेह आढळला. चिंचवड शहरातील चऱ्होली परिसरात धक्कादायक घटना समोर आली आहे. चोविसावाडीत गुरुवारी, २६ जून रोजी सकाळी एका विहिरीत १८ वर्षीय वैष्णवी संतोष इंगवले या तरुणीचा मृतदेह आढळून आला. गेल्या काही दिवसांपासून तरुणी बेपत्ता होती. अखेर दुर्दैवीरित्या तिचा मृतदेह विहिरत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. तरुणीच्या जाण्याने कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. वैष्णवीच्या कुटुंबीयांनी २५ जून रोजी दिघी पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती.

त्यानंतर पोलिसांकडून तरुणीचा शोध सुरू होता. अखेर २६ जूनला ती विहिरीत तळाशी मृतावस्थेत आढळली. प्राथमिक तपासात पोलिसांनी आत्महत्येचा संशय व्यक्त केला असून यामागील नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे.पोलिसांकडून तपास सुरू असताना चोविसावाडीतील घटनास्थळाजवळील विहिरीच्या काठावर वैष्णवीची ओढणी आढळली. तरुणीची ओढणी आढळल्यानंतर पोलिसांचा संशय बळावला. यानंतर तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं.पुढे ४५ फूट खोल विहिरीत अंडरवॉटर कॅमेरा टाकून शोधमोहीम राबवण्यात आली. काही वेळातच कॅमेऱ्यात वैष्णवीचा मृतदेह दिसून आला. अग्निशमन कर्मचाऱ्यांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

वैष्णवीने आत्महत्या का केली, याबाबत तिच्या कुटुंबीयांकडून कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही.या घटनेने चोविसावाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. एका तरुणीचा असा अचानक मृत्यू होणं, विहिरीत मृतदेह आढळणं यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. स्थानिकांमध्येही या घटनेची चर्चा सुरू आहे. पोलीस आत्महत्येच्या विविध शक्यतांचा तपास करत असून, शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे. प्राथमिक तपासात तरुणीने आत्महत्या केल्याचं कळतं आहे. मात्र शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतरच तरुणीच्या मृत्यूचं कारण समजू शकेल. वैष्णवीच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली असून, परिसरात तणावाचं वातावरण आहे. पोलिसांनी याप्रकरणी अधिक तपास सुरू केला आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.