लखनऊच्या विज्ञानपुरी भागात बीसीएच्या विद्यार्थिनीच्या हत्येप्रकरणी हादरवून सोडणारी अपडेट समोर आली आहे. विद्यार्थिनीची हत्या होण्यापूर्वी तिच्या सावत्र वडिलांनी तिच्यावर बलात्कार केला होता, असा आरोप मृत विद्यार्थीनीच्या आईने केला आहे.लखनऊच्या विज्ञानपुरी भागात बीसीएच्या विद्यार्थिनीच्या हत्येप्रकरणी हादरवून सोडणारी अपडेट समोर आली आहे. विद्यार्थिनीची हत्या होण्यापूर्वी तिच्या सावत्र वडिलांनी तिच्यावर बलात्कार केला होता, असा खळबळजनक आरोप तिच्या आईने पोलिसांसमोर केला आहे.
लखनऊच्या विज्ञानपुरी परिसरात एका बीसीएच्या विद्यार्थिनीची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणाला आता नवे वळण आले आहे. पोलीस चौकशीत मृत विद्यार्थिनीच्या आईने पोलिसांना सांगितले की, हत्येपूर्वी तिच्या सावत्र वडिलांनी तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला तिने प्रतिकार केला तर तिच्यावर क्रुरपणे हल्लाही केला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला आहे. आईने केलेल्या गंभीर आरोपांमुळे सावत्र वडिलांची भूमिका संशयास्पद ठरत आहे.









