दोनशे रुपयांवरुन अपमान, तरुणाचं घरी येऊन टोकाचं पाऊल; एकुलता एक लेक गेला, परिसरात हळहळ.

नांदेडमध्ये एका फायनान्स कंपनीतील मॅनेजरने एका १९ वर्षीय कर्मचाऱ्याला २०० रुपयांच्या कारणावरून अपमानित केले. झालेल्या अपमानामुळे त्याने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. रविराजच्या आई-वडिलांनी मॅनेजरवर आरोप केले आहेत. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.ग्राहकाचे दोनशे रुपये मोबाईलवर का घेतले म्हणून मॅनेजरने अपमान करून कामावरुन काढले. हाच अपमान सहन न झाल्याने एका १९ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. अपमान झाल्याच्या भावनेतून तरुणाने हे धक्कादायक पाऊल उचललं. शहरातील सांगवी प्रभागातील गोपाळनगर येथे ही मन हेलावून टाकणारी घटना बुधवारी घडली. रविराज पुंडलिक इंगळे असं मृत तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात मॅनेजवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रविराज इंगळे शहरातील गोपाळनगर येथे आपल्या आई – वडिलांसोबत राहत होता. बारावीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने छत्रपती चौक येथील इजी डील फायनान्स कंपनीमध्ये कम्प्युटर ऑपरेटर या पदावर काम करत होता.

२४ जून रोजी तो नेहमी प्रमाणे कामावर गेला होता. याच दरम्यान त्याने आपल्या मोबाईलवर एका ग्राहकाचे दोनशे रुपये ऑनलाईन मागवून घेतले होते. ही बाब फायनान्स कंपनीचा मॅनेजर मंगेश मग्गीवार याला समजली. त्यानंतर मॅनेजर ग्राहकाचे २०० रुपये तुझ्या मोबाईवर का घेतले? म्हणत त्याला सर्वांसमोर ओरडला, रागावला. तसंच मोबाईल काढून घेऊन त्याला कामावरून काढून टाकलं.सर्वांसमोर झालेला अपमान सहन न झाल्याने रविराज इंगळे याने घरी येऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने टोकाचं पाऊल उचललं त्यावेळी त्याच्या घरी कोणीही नव्हतं. घरात रविराजने आत्महत्या केल्यानंतर काही वेळाने त्याची आई कामावरुन आली. कामावरुन आलेल्या आईला आपला मुलगा पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.तात्काळ या घटनेची माहिती विमानतळ पोलिसांना देण्यात आली.

पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. दरम्यान मॅनेजरने अपमानीत केल्याने आणि कामावरुन काढल्याने मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप मृत मुलाच्या आई-वडिलांनी केला आहे.जनाबाई पुंडलिक इंगळे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलीसांनी मॅनेजर मंगेश मग्गीवार याच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केल्याची माहिती आहे. रविराज हा एकुलता एक मुलगा होता. मुलाने उचललेल्या टोकाच्या पावलामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.