दत्ता आणि तिचे सहमतीने संबंध, वकिलांचा दावा; पीडितेला वेगळीच भीती, त्याला जामीन मिळाला तर…

 पुण्यातील स्वारगेट एसटी बस आगारातील शिवशाही बसमध्ये आरोपी दत्तात्रेय रामदास गाडेने तरुणीवर दोन वेळा बलात्कार केल्याची घटना 25 फेब्रुवारी 2025 रोजी घडली होती.पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरणात आरोपी दत्तात्रेय गाडे याला जामीन दिला, तर आपल्या जीवाला गंभीर धोका निर्माण होईल, अशी भीती पीडित तरुणीने गुरुवारी न्यायालयात व्यक्त केली. आरोपीने यापूर्वी पीडितेची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला असून, त्याची पुनरावृत्ती होऊ शकते. पीडितेच्या संरक्षणाची कोणतीही योजना सादर करण्यात आलेली नाही, असे पीडितेच्या वकिलांनी न्यायालयास दाखवले.पुण्यातील स्वारगेट एसटी बस आगारातील शिवशाही बसमध्ये आरोपी दत्तात्रेय रामदास गाडे, वय 37 वर्ष, रा. गुनाट, शिरुर, याने तरुणीवर दोन वेळा बलात्कार केल्याची घटना 25 फेब्रुवारी 2025 रोजी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास घडली होती.

या प्रकरणी आरोपीच्या विरोधात स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 893 पानांचे आरोपपत्र पुणे न्यायालयात दाखल करण्यात आलेले आहे. त्यानंतर आरोपी गाडेने ॲड. वाजेद खान बीडकर यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला आहे.आरोपी व पीडितेत सहमतीने संबंध झाले आहेत; तसेच असे कोणतेही कृत्य घडले नाही, आरोपीवरचे पूर्वीचे गुन्हे लैंगिक अत्याचाराचे नसून, चोरी व दरोड्याचे आहेत, असे युक्तिवाद बचाव पक्षातर्फे करण्यात आले.त्याला विशेष सरकारी वकील ॲड. अजय मिसार आणि पीडितेच्या वतीने ॲड. असीम सरोदे यांच्या ज्युनिअर ॲड. श्रीया आवले यांनी विरोध केला. पीडितेच्या इच्छेविरुद्ध व तिच्या संमतीशिवाय लैंगिक अत्याचार केला आहे.

तपासातील पुराव्यांमध्ये विविध पंचनामे, तज्ज्ञांचे अभिप्राय, लोकेशन ट्रेसेस इत्यादींचा समावेश असून, त्यात आरोपी व पीडिता यांच्यात पूर्वी संपर्क नव्हता व त्यांच्यात आर्थिक व्यवहारही झालेला नाही, असे निदर्शनास आले असल्याचे पीडितेतर्फे सांगण्यात आले.आरोपीस जामिनावर सोडल्यास पीडितेच्या जीवितेला धोका निर्माण होईल, असा युक्तिवाद सरकार पक्ष व पीडितेच्या वकिलांनी केला. आता या अर्जावर आज, शुक्रवार दि 27 जून रोजी आदेश होण्याची शक्यता आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.