मॅट्रिमोनियल साईटवर ओळख, ऑस्ट्रेलियाहून पुण्यात राहायला, घटस्फोटित महिलेच्या 5 कोटींच्या पोटगीवर डोळा, पोलिसांनी प्रकरण कसं बाहेर काढलं?

पुणे सायबर पोलिसांनी ‘शादी डॉट कॉम’वरील फसवणूक प्रकरणी एका आंतरराष्ट्रीय सायबर चोरट्याला अटक केली. आरोपीने महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तीन कोटी साठ लाख रुपये उकळले.’शादी डॉट कॉम’वरून ओळख वाढवून महिलेची तीन कोटी ६० लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायबर चोरट्याला पुणे सायबर पोलिसांनी मुंबई विमानतळावर अटक केली. महिलेला लग्नाचे वचन देऊन, परदेशात व्यवसाय वाढवण्याचे आमिष दाखवून आरोपीने रक्कम उकळली होती.’डॉ. रोहित ओबेरॉय उर्फ अभिषेक शुक्ला (मूळ भारतीयः सध्या ऑस्ट्रेलियात स्थायिक) असे आरोपीचे नाव आहे. तो मूळचा लखनौचा असून, पर्थ येथे स्थायिक आहे. त्याने ऑस्ट्रेलियाचे नागरिकत्व स्वीकारले असून, तेथे लग्नही केलेले आहे. त्याला दोन मुले आहेत,’ अशी माहिती गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त पंकज देशमुख यांनी दिली. उपायुक्त विवेक मासाळ, सहायक आयुक्त मच्छिंद्र खाडे आणि सायबर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक स्वप्नाली शिंदे आदी या वेळी उपस्थित होते.

दिल्लीतील महिला पुण्यात खराडी येथे काही काळ राहत होती. तिने ‘शादी डॉट कॉम’वर लग्नासाठी प्रोफाइल तयार केले होते. सन २०२३ मध्ये आरोपीने डॉ. रोहित ओबेरॉय नावाच्या प्रोफाइलद्वारे महिलेला मेसेज केला. ऑस्ट्रेलियातील डॉक्टर असल्याचे भासवून त्याने महिलेशी मैत्री केली. त्यानंतर तो पुण्यात आला. दोघे काही काळ पुण्यासह देशात एकत्र राहिले. महिलेला तिच्या पहिल्या पतीकडून पाच कोटी रुपयांची पोटगी मिळाली होती.ही माहिती आरोपीला समजल्यावर त्याने तिचा विश्वास संपादन करून, व्यवसायासाठी सिंगापूरहून गुंतवणूक मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी इव्हान हँदायनी आणि विन्सेंट कुआन नामक लोकांची ओळख करून दिली. या तिघांनी मिळून पीडितेला सिंगापूर आणि भारतातील विविध बँकांमध्ये टप्प्याटप्याने तीन कोटी ६० लाख रुपये भरण्यास भाग पाडले. त्यानंतर आरोपी ऑस्ट्रेलियाला गेला आणि महिलेशी संपर्क टाळू लागला.

पीडित महिलेला त्याबाबत संशय आला. महिलेने मैत्रिणीला घडलेला प्रकार सांगितला. त्या वेळी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.’फसवणूक झाल्याचे कळाल्यावर महिलेने तात्काळ सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तपासात डॉ. रोहित ओबेरॉय हे नाव बनावट असून, त्याचे खरे नाव अभिषेक शुक्ला असल्याचे समोर आले. पोलिसांनी आरोपीला न्यायालयात सादर केले असता, त्याला २९ जूनपर्यंतची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. आरोपीकडून फसविले गेलेल्यांनी ७०५८७१९३७१/७५ या क्रमांकावर संपर्क साधावा,’ असे आवाहन गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त पंकज देशमुख यांनी केले आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.