ठाकरे बंधूंच्या घोषणेनंतर भाजपच्या गोटात मोठ्या हालचाली; आंदोलनाला उत्तर देण्यासाठी मास्टरप्लॅन ठरला!.

महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषेच्या सक्तीवरून राजकारण तापले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोर्चाची घोषणा केली आहे. अनेक वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या आधी हा मोर्चा होणार असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. भाजपने या मोर्चाला उत्तर देण्यासाठी नवी रणनीती आखली आहे.मुंबई: राज्यातील शाळांमध्ये पहिली इयत्तेपासून हिंदी भाषेची सक्ती आणि त्रिभाषा सूत्राच्या अंमलबजावणीच्या विरोधात मनसे अध्यक्ष Raj Thackeray यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आक्रमक झाले आहेत. या दोघांनी मोर्चाची घोषणा केली असून दोन्ही नेते एकत्रच मोर्चात सहभागी होतील, अशी घोषणा ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नुकतीच केली. अनेक वर्षांनंतर दोन्ही ठाकरे बंधूंचं राजकीय मनोमिलन होणार असल्याने मराठीच्या आंदोलनाच्या निमित्ताने मुंबईच्या रस्त्यावर मोठी गर्दी लोटण्याची शक्यता आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या आधी होणारा हा मोर्चा भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकतो. या पार्श्वभूमीवर भाजपने आता राज आणि उद्धव ठाकरे यांच्या या मोर्चाची धग कमी करण्यासाठी नवी रणनीती आखली आहे.भाजपने मराठी-हिंदी वादाचे राजकारण हाणून पाडण्याचा निर्धार केला असून BJPच्या कोअर कमिटीच्या बैठकीत याबाबतची रणनीती ठरवण्यात आली आहे.

मराठी-हिंदीवरुन सुरू असलेल्या राजकारणाला आता मराठी अभिजात भाषेचा मुद्दा पुढे करुन शह देण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जाईल. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय PM Narendra Modi यांच्यामुळे झाला, ही गोष्ट भाजप लोकांपर्यंत पोहोचवणार आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने त्याचा मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कसा फायदा होणार, याचे महत्त्व भाजप लोकांमध्ये जाऊन सांगणार आहे.भाजपने मराठी-हिंदी वादाचे राजकारण हाणून पाडण्याचा निर्धार केला असून BJPच्या कोअर कमिटीच्या बैठकीत याबाबतची रणनीती ठरवण्यात आली आहे. मराठी-हिंदीवरुन सुरू असलेल्या राजकारणाला आता मराठी अभिजात भाषेचा मुद्दा पुढे करुन शह देण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जाईल. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय PM Narendra Modi यांच्यामुळे झाला, ही गोष्ट भाजप लोकांपर्यंत पोहोचवणार आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने त्याचा मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कसा फायदा होणार, याचे महत्त्व भाजप लोकांमध्ये जाऊन सांगणार आहे.दरम्यान, भाजपचा हा प्रयत्न हिंदी सक्तीवरून उभे राहत असलेल्या ठाकरे बंधूंच्या आंदोलनाला उत्तर देण्यासाठी पुरेसा ठरतो का, हे आगामी काळातच स्पष्ट होणार आहे.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार Sanjay Raut यांनी एक मोठी घोषणा केली आहे. त्यांनी ठाकरे बंधूंचा एकत्र फोटो शेअर केला असून राज्यातील शाळांमध्ये हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात हे दोघे एकत्र मोर्चा काढणार असल्याचं राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे लवकरच एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत.संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा फोटो शेअर केला आहे. राऊत म्हणाले, “महाराष्ट्रतील शाळांत हिंदी सक्तीविरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल”. या घोषणेमुळे राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. अनेक दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा होती. आता संजय राऊत यांच्या घोषणेमुळे अखेर ही चर्चा प्रत्यक्षात उतरत असल्याचं दिसत आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.