कोकण, विदर्भ, मराठवाड्यासाठी महत्त्वाची बातमी, 3 जुलैपर्यंत कसा असेल पाऊस? हवामान खात्याचा इशारा.

 मुंबईत कुलाबा येथे जूनच्या पावसाची सरासरी ओलांडली गेली. कोकण विभागात सरासरीहून अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.मुंबईकरांना गुरुवारी पुन्हा बऱ्याच दिवसांनी पावसाळ्याचा अनुभव घेता आला. दिवसभर संततधार कायम राहिल्याने वातावरण काहीसे थंड होऊन दिलासा मिळाला. मुंबईत पावसाचा फार जोर नसला तरी संततधारेमुळे कुलाबा येथे १ जूनपासून पडलेल्या पावसाने जूनची सरासरी ओलांडली आहे. दरम्यान, उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी, तसेच उत्तर कोकणात काही ठिकाणी सरासरीहून अधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.कुलाबा येथे सकाळी ८.३० ते सायं. ५.३० या वेळेत १३ मिलीमीटर, तर सांताक्रूझ येथे १७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. दिवसभर पडलेल्या पावसामुळे कुलाबा येथे २४ तासांत कमाल तापमान आणखी खाली उतरले. कुलाबा येथे २९.६ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले, तर सांताक्रूझ येथे ३०.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण ९० टक्क्यांहून अधिक असले तरी कमाल तापमानाचा पारा उतरल्याने उकाड्याचा ताप कमी झाल्याचे निदर्शनास आले.दिवसभर दक्षिण मुंबईत तुलनेने पावसाचे प्रमाण अधिक होते. मुंबईत गुरुवार सकाळी ८.३० ते शुक्रवार सकाळी ८.३० या कालावधीसाठी ‘यलो अलर्ट’ देण्यात आला होता.

या कालावधीत एक-दोन ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. आज, शुक्रवारीही एक-दोन ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो.मुंबईत १ जूनपासून पडलेल्या पावसाने कुलाबा येथे जूनची पावसाची सरासरी ओलांडली आहे. कुलाबा येथे आत्तापर्यंत ५४८.२ मिलीमीटर, तर सांताक्रूझ येथे ४७८.९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जूनमध्ये कुलाबा येथे सरासरी ५४०.९ मिलीमीटर, तर सांताक्रूझ येथे ५०५ मिलीमीटर पाऊस पडतो. सांताक्रूझ येथील पावसाची सरासरी गाठण्यासाठी आणखी पावसाची गरज आहे. मात्र संततधार कायम राहिली तर ही सरासरीही लवकर गाठली जाईल असा अंदाज आहे.पावसाचे पुढील दोन आठवड्यांचे गुरुवारी २६ जून रोजी पूर्वानुमान वर्तवण्यात आले आहे. यानुसार २६ जून ते ३ जुलै या कालावधीत गुजरात, राजस्थानमध्ये पावसाचा जोर अधिक असेल अशी शक्यता आहे. याचा परिणाम उत्तर कोकणावर दिसू शकतो. तसेच, उत्तर महाराष्ट्रावरही होऊ शकेल. २६ जून ते ३ जुलै या कालावधीत कोकण विभागात सरासरीहून अधिक पाऊस असेल. मराठवाडा, विदर्भातही सरासरीहून अधिक पावसाची शक्यता आहे. त्यानंतरच्या आठवड्यातही कोकण, गोवा येथे सरासरीहून अधिक पाऊस असू शकतो.

विदर्भातही १० जुलैपर्यंतच्या आठवड्यात सरासरीहून अधिक पाऊस असेल. मात्र त्यानंतर २४ जुलैपर्यंत सरासरीपेक्षा पावसाचे प्रमाण कमी असण्याचा अंदाज आहे. हा अंदाज पुढच्या गुरुवारी अधिक खात्रीपूर्वक वर्तवण्यात येईल.राज्यात गुरुवारी दिवसभर सर्वाधिक कमाल तापमान डहाणू येथे ३१.८ अंश सेल्सिअस नोंदले गेले. राज्यभर पावसाच्या उपस्थितीने कमाल तापमानाचा पारा खाली उतरला आहे. मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात काही ठिकाणी चार ते पाच अंशांनी सरासरीपेक्षा कमाल तापमान खाली उतरले आहे. विदर्भात पावसाचा जोर अधिक असून इथे सात ते नऊ अंशांपर्यंत तापमानाचा पारा खाली उतरला आहे. या विभागात किमान आणि कमाल तापमानात फार मोठा फरक नोंदला गेलेला नाही.दरम्यान, अकोला येथे दिवसभर ६९, तर वर्धा येथे ५४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. राज्यात काही ठिकाणी पावसाचा फटका बसल्याने जनजीवनही विस्कळीत झाले आहे. शुक्रवारी रायगड, रत्नागिरी, पुणे घाट परिसर, सातारा घाट परिसर येथे ‘ऑरेंज अलर्ट’, तर विदर्भात सर्वच जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसासह ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.