वडिलांनी शाळेत सोडलं, दुसऱ्या दिवशी विद्यार्थिनीने हॉस्टेलमध्ये टोक गाठलं; खोलीत गेली आणि…

 हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील पिंपळदरी आश्रम शाळेत एका १६ वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केली. विद्यार्थिनीने वसतिगृहातील खोलीत पंख्याला गळफास लावून जीवन संपवलं. या घटनेने परिसरात शोक पसरला आहे.हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी येथील आदिवासी आश्रम शाळेत १६ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. २५ जून रोजी दुपारी दोन वाजताच्या दरम्यान ही धक्कादायक घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून औंढा नागनाथ तालुक्यातील भोसी येथील १६ वर्षीय विद्यार्थीनी शासकीय आदिवासी निवासी आश्रम शाळेत शिकत होती.दरम्यान मंगळवारी स्वाती आणि तिच्या भावाला वडिलांनी शाळेत आणून सोडलं होतं. सकाळी वडील परत आपल्या मुलीला भेटण्यासाठी आले होते. त्यावेळी दोघांनी अर्धा तास गप्पा मारल्या होत्या. त्यानंतर स्वाती आपल्या मैत्रिणीसह भोजनासाठी गेली होती. अचानक तिने खोलीमध्ये जाऊन येथे असं सांगत मैत्रिणीला बाजूला सोडून खोलीमध्ये गेली आणि आपल्या जवळच्या ओढणीने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. पंख्याला लटकल्याने वस्तीगृहात मोठा आवाज झाला आवाज झाल्याने वस्तीवृहातील विद्यार्थींनी आमि वस्तीगृहाच्या अधिक्षकांनी घटनास्थळी धावत जाऊन पाहिलं असता खोलीमध्ये स्वातीने पंख्याला गळफास घेतल्याचं दिसून आलं.विद्यार्थिनींनी आरडाओरडा करत तातडीने स्वातीला खाली उतरवलं आणि तातडीने प्राथमिक उपचारासाठी पिंपळदरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणलं. तिच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिचा मृत्यू झाला असल्याचं सांगितलं.घटनेची माहिती सर्वत्र पसरली. आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे अधिकारी, मुख्याध्यापक आणि इतर तातडीने रुग्णालयात दाखल झाले होते. नातेवाईकांनी पिंपळदरीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केल्यानंतर स्वातीची ऑक्सिजन लेवल कमी होती, त्यामुळे तातडीने ऑक्सिजन सुविधा आणि रुग्णवाहिका मिळाली नसल्याचा आणि हलगर्जीपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे. घटना घडून एक तासानंतर देखील रुग्णवाहिका आली नसल्याने नातेवाईकांनी रोष व्यक्त केला आहे. रात्री उशिरापर्यंत मृतदेह जिल्हा ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आला होता. तरुणीच्या अशा जाण्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.