लुधियानामध्ये एका निळ्या ड्रममध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. अज्ञात मारेकऱ्यांनी तरुणाची हत्या करून त्याचा मृतदेह गोणीत भरून ड्रममध्ये टाकला.चंदिगढ: मेरठमध्ये घडलेलं ड्रम हत्याकांड ताजं असताना आता लुधियानात एका निळ्या ड्रममध्ये तरुणाचा मृतदेह सापडला आहे. मारेकऱ्यांनी तरुणाची हत्या करुन त्याचा मृतदेह एका गोणीत भरला. त्यानंतर तो निळ्या ड्रममध्ये भरुन फेकून दिला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.रस्त्याच्या शेजारी पडून असलेल्या ड्रममधून प्रचंड दुर्गंधी येत असल्यानं स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी ड्रममधून गोणी बाहेर काढली. तेव्हा त्यात एक मृतदेह सापडला. तरुणाचे हात, बांध बांधलेले होते. मृतदेह जाळण्याचा प्रयत्नदेखील करण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे.










