त्यांनी मला फोन केला आणि…पृथ्वीचं सचिन तेंडुलकरांबद्दल मोठं विधान; असं काय म्हणाला?

स्टार क्रिकेटपटू पृथ्वी शॉ बऱ्याच काळापासून संघाबाहेर आहे. 2018 मध्ये भारतासाठी पदार्पण करताना, त्याने त्याच्या पहिल्याच कसोटी सामन्यात शतक झळकावून प्रसिद्धी मिळवली होती, परंतु तीन वर्षांतच तो संघाबाहेर गेला.स्टार क्रिकेटपटू पृथ्वी शॉ बऱ्याच काळापासून संघाबाहेर आहे. 2018 मध्ये भारतासाठी पदार्पण करताना, त्याने त्याच्या पहिल्याच कसोटी सामन्यात शतक झळकावून प्रसिद्धी मिळवली होती, परंतु तीन वर्षांतच तो संघाबाहेर गेला. कमी वयात मिळालेलं यश त्याला जास्त काळ टिकवताना आले नाही. सध्या पृथ्वीला एकामागोमाग एक मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागले. आता पृथ्वीने एक मोठा खुलासा केला आहे.

2021 नंतर,पृथ्वी मुंबई क्रिकेट संघाबाहेर होता. 2025च्या आयपीएलमध्येही कोणत्याही फ्रँचायझीने त्याला खरेदी करण्यात रस दाखवला नाही. 25 वर्षीय क्रिकेटपटूने त्याच्या संघर्षाच्या दिवसांबद्दल उघडपणे सांगितले की, जेव्हा तो त्याच्या कारकिर्दीच्या वाईट काळातून जात होता तेव्हा फक्त ऋषभ पंत आणि सचिन तेंडुलकरने त्याला फोन केला होता. त्यांच्याशिवाय या कठीण काळात कोणत्याही मोठ्या क्रिकेटपटूने त्याची आठवण काढली नाही.”पृथ्वी पुढे म्हणाला की, “सचिन तेंडुलकरांना माझ्या संघर्षाची जाणीव आहे, कारण त्यांनी सुरुवातीपासूनच मला अर्जुन तेंडुलकरसोबत पाहिले आहे. मी त्यांच्या घरीही गेलो आहे. मी हे देखील कबूल करतो की अनेक चुकीचे निर्णय घेतले आणि क्रिकेटला कमी वेळ देऊ लागलो. मी आयुष्यात अनेक चुकीचे निर्णय घेतले आहेत. मी क्रिकेटला कमी वेळ देऊ लागलो. मी पूर्वी खूप सराव करायचो. मी नेटमध्ये ३-४ तास फलंदाजी करायचो. मला थकवा जाणवत नव्हता. मी अर्धा दिवस मैदानावर घालवायचो, पण हळूहळू माझे लक्ष विचलित होऊ लागले.”मुलाखतीदरम्यान शॉ पुढे म्हणाला, “जेव्हा माझी भारतीय संघात निवड झाली तेव्हा मी माझ्या कारकिर्दीच्या शिखरावर होतो. जेव्हा तुम्ही अव्वल स्थानावर असता तेव्हा तुम्ही खूप लवकर मित्र बनवू लागता. तेच मित्र नंतर मला इकडे तिकडे घेऊन जायचे. मी काही खूप चुकीचे मित्र बनवले होते. त्यानंतर, या सर्व गोष्टींमुळे मी मार्गावरून चुकलो. मी पूर्वी दिवसाला 8 तास सराव करायचो पण हळूहळू तो सराव फक्त 4 तासांवर आला, ज्यामुळे त्याच्या खेळावर परिणाम होऊ लागला.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.