दिपनगर औष्णिक विद्युत प्रकल्पाच्या पर्यावरणीय समस्यांवर उपाययोजनांना गती आमदार एकनाथ खडसे यांचे तक्रारीचा केला निपटारा .

दिपनगर औष्णिक विद्युत प्रकल्पाच्या पर्यावरणीय समस्यांवर उपाययोजनांना गती आमदार एकनाथ खडसे यांचे तक्रारीचा केला निपटारा .दिपनगर येथील औष्णिक विद्युत प्रकल्पाच्या अपूर्ण कामांसंदर्भात व पर्यावरणीय समस्यांवर अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आवाज उठवला होता. प्रदूषण नियंत्रण मंडळ, केंद्रीय विद्युत प्राधिकरण व विविध यंत्रणांकडे वेळोवेळी तक्रारी करण्यात आल्या. त्यानंतर सेंट्रल इलेक्ट्रिसिटी अथॉरिटीने याची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले.या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रकल्प संचालक लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली. दिनांक ३ जून व १३ जून रोजी या समितीने संपूर्ण परिसराची पाहणी केली. या दौऱ्यात वेल्हाळे, अशबंड परिसरातील नागरिक व सरपंचांसोबत चर्चा करून स्थानिक समस्या जाणून घेतल्या.

प्रमुख समस्या व निरीक्षणे:वेल्हाळे गावात भूगर्भातील पाणी प्रदूषित झाल्याचे निदर्शनास आले आहे.पाईपलाईनमधून राख वाहून विल्लाड नदी, पुरा नाला, रपात नाला, किन्ही नाल्यासारख्या जलस्रोतांमध्ये राख साचल्याने प्रदूषण वाढले आहे.नागरिकांनी शुद्ध पिण्याच्या पाण्याची मागणी केली आहे.प्रकल्पातील अपूर्ण कामे:६६० मेगावॉट क्षमतेच्या प्रकल्पात रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि वॉटर रिचार्ज पिट्सची गरज आहे.३८ हेक्टर वृक्षारोपणाचे काम प्रलंबित आहे.२x५०० मेगावॉट प्रकल्पात १०० एकर वृक्षारोपणाचे काम बाकी आहे.प्रकल्पाचे चीफ इंजिनिअर  मोराळे यांनी तापी नदीत होणारे प्रदूषण थांबवण्यासाठी तत्काळ उपाययोजना सुरू केल्याचे सांगितले. नदी व नाल्यांमधील राख पूर्णपणे काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले.अधिकाऱ्यांची उपस्थिती व सूचना: या बैठकीत उपजिल्हाधिकारी मोरे मॅडम, वनविभागाचेबिराजदार, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे राजपूत, बीटीपीएसचे अधिकारी  मोराळे, एकनाथराव खडसे, शेतकरी नेते राजेंद्र चौधरी तसेच वेल्हाळा गावचे योगेश पाटील, विजय पाटील, अशबंडचे सरपंच, जाडगाव ,मन्यारखेडा अजय इंगळे, सुधाकर चौधरी, अभिमान शिरसाट, मयूर शेळके इतरही बाधित शेतकरी उपस्थित होते.

सर्व सदस्यांनी आपापल्या क्षेत्रातील समस्या मांडल्या. तक्रारीत नमूद सर्व बाबी सत्य आढळल्याचे समितीने मान्य केले.महत्त्वपूर्ण निर्णय:१३८ एकर क्षेत्रावर वृक्षारोपणाचे नियोजन.हे काम ५ वर्षांसाठी निवडक कंपनीकडे देऊन, झाडे जगवण्याची हमी घेण्याचा प्रस्ताव.झाडे फक्त इतरत्र नव्हे, तर वेल्हाळा, अशबंड व इतर प्रभावित गावांमध्ये प्राधान्याने लावण्यात यावीत.खडसे यांची भावना: यावेळी एकनाथराव खडसे यांनी, “तक्रारींपेक्षा समस्यांचे निराकरण हे महत्त्वाचे असून, राज्य व केंद्र सरकारने ८०० मेगावॉटसह इतर प्रकल्प मंजूर करावेत, जेणेकरून तालुक्याचा व जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधता येईल,” असे मत व्यक्त केले.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.