ऑपरेशन सिंदूरनंतर पाकनं गियर बदलला; अमेरिका टप्प्यात, भारताला वाढता धोका, रिपोर्टनं खळबळ.

अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनी पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. पाकिस्तान अमेरिकेपर्यंत मारा करू शकणारे अण्वस्त्र सज्ज क्षेपणास्त्र विकसित करत आहे. चीनकडून यासाठी पाकिस्तानला मदत मिळत असल्याचा दावा आहे.वॉशिंग्टन डीसी: अमेरिकेच्या गोपनीय यंत्रणांच्या एका अहवालातून चिंताजनक माहिती समोर आली आहे. पाकिस्तान गोपनीय पद्धतीनं एक अण्वस्त्रयुक्त आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र (आयसीबीएम) विकसित करत असल्याची माहिती उघड झाली आहे. विशेष म्हणजे पाकिस्तान तयार करत असलेलं क्षेपणास्त्र थेट अमेरिकेपर्यंत हल्ला करु शकतं. अमेरिकेतील प्रतिष्ठित जर्नल ‘फॉरेन अफेअर्स’मध्ये याबद्दलचा अहवाल प्रसिद्ध झालेला आहे.भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान त्यांच्या अण्वस्त्र शक्ती सातत्यानं वाढत आहे. यासाठी त्यांना चीनकडून मदत मिळत आहे. पाकिस्ताननं अण्वस्त्रयुक्त आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र तयार केल्यास अमेरिका त्यांना अण्वस्त्र शत्रू घोषित करेल, अशी माहिती अहवालात अमेरिकन अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं देण्यात आलेली आहे.

अण्वस्त्र असलेला कोणताही देश अमेरिकेसाठी धोका असल्यास त्या देशाला अण्वस्त्र विरोधी घोषित केलं जातं. सध्याच्या घडीला या यादीत चीन, अमेरिका , उत्तर कोरिया यांचा समावेश आहे.पाकिस्तान अण्वस्त्रयुक्त आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र तयार करण्यात यशस्वी झाल्यास अमेरिका त्यांच्या टप्प्यात येईल. मग अशा परिस्थितीत अमेरिकेकडे पाकिस्तानला अण्वस्त्र शत्रू घोषित करण्याशिवाय कोणताही पर्याय नसेल. एखादा देश अमेरिकेपर्यंत मारा करणारं अण्वस्त्रयुक्त आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आपल्या ताफ्यात ठेवत असल्यास तो देश अमेरिकेचा मित्र असू शकत नाही, असा उल्लेख अमेरिकेच्या अधिकाऱ्याच्या हवाल्यानं अहवालात करण्यात आलेला आहे.आमचा अण्वस्त्र कार्यक्रम केवळ भारताला रोखण्यासाठी असल्याचं पाकिस्तान सातत्यानं सांगत आहे.

पाकिस्तान आतापर्यंत केवळ लघु आणि मध्यम टप्प्याच्या क्षेपणास्त्रापर्यंत लक्ष केंद्रित करत आलेला आहे. पाकिस्तानकडे सध्याच्या घडीला कोणतंही अण्वस्त्रयुक्त आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र नाही. २०२२ मध्ये पाकिस्ताननं शाहीन-३ नावाच्या एका क्षेपणास्त्राची चाचणी केली. त्याची मारक क्षमता २७०० किलोमीटर आहे. भारताची अनेक शहरं या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात येतात.अण्वस्त्रयुक्त आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र (आयसीबीएम) अणू आणि पारंपारिक अशा दोन्ही प्रकारची असू शकतात. त्यांची मारक क्षमता प्रचंड असते. ती ५५०० किलोमीटरपेक्षा दूरवरील लक्ष्यावर प्रहार करु शकतात. सध्याच्या घडीला आपल्याकडे एकही अण्वस्त्रयुक्त आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र नसल्याचा पाकिस्तानचा दावा आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.