मुसळधार पावसात कार कालव्यात कोसळली, उत्तराखंडमध्ये चार दिवसांच्या बालकासह चौघांचा हृदयद्रावक अंत.

उत्तराखंडमध्ये एका कालव्यात वाहन पडून नवजात बाळासह चार जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याची घोषणा करण्यात आली आहे.उत्तराखंडमध्ये नैनीताल जिल्ह्यातील हल्द्वानी येथे मुसळधार पाऊस सुरू आहे. बुधवारी मुसळधार पावसामुळे एक कार रस्त्यावरून घसरून ओव्हरफ्लो झालेल्या कालव्यात पडल्याने एका चार दिवसांच्या नवजात बाळासह चार जणांचा मृत्यू झाला असल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेत तीन जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेव्यतिरिक्त, उत्तराखंडमध्ये दोन यात्रेकरूंचा भूस्खलनात मृत्यू झाला आहे.हल्द्वानी येथे कार रस्त्यावरुन घसरुन कालव्यात पडल्याने झालेल्या दुर्घटनेतील मृतांमध्ये एका चार दिवसांच्या नवजात बाळासह दोन महिला आणि एका पुरुषाचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तीन जखमींवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. दुर्घटनेनंतर बचाव कार्य तातडीने सुरू करण्यात आलं. बचाव कार्यादरम्यान कालव्याखालून कार बाहेर काढण्यात आली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.हल्द्वानी येथील दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना शासनाने आर्थिक मदत जाहीर केली आहे. जखमींच्या उपचाराचा खर्च सरकार उचलणार आहे. चिमुकल्यासह इतर तिघांच्या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

नैनीताल जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्द्वानी येथील घटनेची चौकशी सुरू आहे. याप्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. पावसामुळे रस्ते निसरडे झाल्याने अपघात होण्याची शक्यता वाढली आहे, त्यामुळे वाहन चालकांनी अधिक काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे.याआधी सोमवारी, उत्तराखंडमधील यमुनोत्री मंदिराच्या ट्रेकिंग मार्गावर भैरव मंदिराजवळ भूस्खलन झालं आणि यात दोन यात्रेकरू ठार झाले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांचेही मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले. दुसरीकडे महाराष्ट्रातील एक जखमी यात्रेकरुला याआधीच्या भूस्खलनाच्या घटनेत वाचवण्यात आलं आणि रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.उत्तराखंडमध्ये सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. भूस्खलनात अनेकजण जखमी झाले आहेत. यमुनोत्री मार्गावर झालेल्या भूस्खलनामुळे बचाव कार्यात अडचणी येत होत्या, परंतु प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून जखमींना रुग्णालयात पोहोचवलं.

त्तराखंड सरकारने राज्यातील सर्व पर्यटन स्थळांवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्याचे निर्देश दिले आहेत, जेणेकरून भविष्यात अशा घटना टाळता येतील. नागरिकांनीही प्रवास करताना अधिक सतर्क राहून प्रशासनाला सहकार्य करावं, असं आवाहन करण्यात आलं आहे. शिवाय नैसर्गिक आपत्तीमुळे उत्तराखंडमध्ये वारंवार नुकसान होतं, त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनासाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. राज्य सरकारने नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती पाऊले उचलण्याची गरज आहे.उत्तराखंडमध्ये पावसाळ्यामध्ये दरवर्षी नैसर्गिक आपत्त्या येतात, यात अनेक लोकांना यात आपला जीव गमवावा लागतो. या पार्श्वभूमीवर, सरकारने ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे, जेणेकरून भविष्यात अशा घटना टाळता येतील. उत्तराखंड सरकारने राज्यातील धोकादायक स्थळांची पाहणी करून तेथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची व्यवस्था करावी, जेणेकरून भविष्यात होणारी जीवितहानी टाळता येईल.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.