दोन गटांत जबर राडा, हॉटेलमध्ये बसलेल्या तरुणांवर अचानक हल्ला, एक दगावला एक गंभीर, धक्कादायक कारण समोर.

 हिंगोली जिल्ह्यातील वसमतमध्ये एका युवकाचा अमानवी खून झाला आहे. हयातनगर फाट्याजवळ 24 तारखेला रात्री दोन गटांमध्ये तीव्र झगडा झाला. 22 वर्षीय विशाल देवरेवर धारदार शस्त्रांनी वार करण्यात आले. पोलिसांच्या माहितीनुसार… हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हयातनगर फाटा परिसरात 24 तारखेला रात्री दहाच्या सुमारास दोन गटात जोरदार हाणामारी झाली. यात धारदार शस्त्रांनी हल्ला केल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला. विशाल मुंजाजी देवरे (वय 22) असे मृत तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मुलीच्या कारणावरून घडली असावी, असा अंदाज आहे.हयातनगर फाट्याजवळ एका हॉटेलमध्ये काही तरुण बसले होते. त्यावेळी त्यांच्यावर अचानक हल्ला झाला. विशाल देवरे आणि त्याचा मित्र ओमकार नरवाडे हे दोघे हॉटेलमध्ये बसले होते. त्याचवेळी थोरवा येथील गोपाळ देवरे, शिवाजी देवरे आणि ऋषिकेश कदम तिथे आले. या तिघांनी विशाल आणि ओमकार यांच्यावर खंजीराने वारकेले.

अचानक झालेल्या हल्ल्यामुळे दोघांनाही प्रतिकार करता आला नाही. विशालच्या पोटावर आणि छातीवर वार झाले. तर, ओमकारच्या पोटावर वार करण्यात आले. मारहाण झाल्यावर हल्लेखोर पळून गेले.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विशाल पाटील आणि हट्टा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक संग्राम जाधव यांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली.पोलिसांनी जखमी विशालला उपचारासाठी वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात नेले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

ओमकारला प्राथमिक उपचारानंतर नांदेडला हलवण्यात आले आहे.हट्टा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक संग्राम जाधव यांच्या तीन टीम फरार आरोपींचा शोध घेत आहेत. या घटनेमध्ये मुलीच्या कारणावरून घटना झाली असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. “फरार आरोपींवर हट्टा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे,” अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक संग्राम जाधव यांनी दिली.या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे. पोलीस आरोपींना लवकरात लवकर पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी कसून शोध मोहीम सुरु केली आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.