इराण-इस्रायल युद्धाचा महाराष्ट्रात परिणाम, दररोजची शंभर टन केळी निर्यात ठप्प; शेतकऱ्यांना फटका, गणित काय?

 नांदेड जिल्ह्यातील केळी उत्पादक इराण आणि इस्रायलमधील युद्धामुळे अडचणीत आले आहेत. युद्धाचा परिणाम केळीच्या निर्यातीवर झाला आहे. दररोज सुमारे शंभर टन केळीची निर्यात थांबली आहे. गेल्या जवळपास १३ दिवसांपासून इस्त्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरू आहे. या दोन देशांच्या युद्धादरम्यान अमेरिकेनेही उडी घेतली असून अमेरिकेने इस्त्रायलच्या समर्थनार्थ इराणवर क्षेपणास्त्र डागली. या इराण आणि इस्रायलमधील युद्धाचा फटका देशभरातील अनेक गोष्टींवर झाला आहे. महाराष्ट्रातही या दोन देशांतील युद्धाचा मोठा परिणाम झाला आहे. नांदेड जिल्ह्यात केळीला इराण आणि इस्रायलच्या युद्धाचा फटका बसला आहे.युद्धामुळे दररोज शंभर टन केळीची निर्यात ठप्प झाली आहे. दुसरीकडे आखाती देशातील दुबई आणि इरामध्ये केळीची निर्यात सुरु असून १८०० प्रतिक्विंटल दर मिळत आहे.

दरम्यान युद्धामुळे निर्यात थांबल्याने शेतकऱ्यांना स्थानिक बाजारपेठेत कमी दरात केळीची विक्री करावी लागत आहे.राज्यात केळी उत्पादनात जळगावनंतर मराठवाड्यात नांदेड जिल्ह्याचा नंबर लागतो. नांदेडसह शेजारील हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील काही भाग असं जवळपास १५ हजार हेक्टर क्षेत्र केळी लागवडीचं आहे. यातून वर्षाकाठी जवळपास ७ लाख ५० हजार टन केळीचं उत्पादन होतं.जिल्ह्यातील नांदेड, अर्धापूर आणि मुदखेड तालुका या भागात प्रचंड प्रमाणात केळी पिकाची लागवड केली जाते. नांदेड जिल्हा हा निर्यातक्षम केळी उत्पादनासाठी मराठवाड्यात प्रसिद्ध आहे. अर्धापुरची केळी महाराष्ट्रातच नाहीतर संपूर्ण देशात आणि विदेशातही प्रसिद्ध आहेत.

आफगाणिस्तान, तुर्कस्तान, इराण, दुबई या देशात येथील केळीची निर्यात होते. या सर्व भागातील केळीची व्यापार पेठ म्हणून नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर प्रसिद्ध आहे.दरम्यान, सध्या केळीचे दर तेजीत आहेत. बाहेर ठिकाणी १७०० ते १८०० रूपये क्विंटलला दर मिळत आहे. तर, स्थानिक बाजार पेठत १२०० ते १५०० रूपये क्विंटलला दर मिळत आहे. जवळपास शंभर टन केळी रोज बाहेर देशात पाठवण्यात येतात. इराण – इस्रायलच्या युद्धामुळे निर्यात बंदी झाली असून इराक आणि दुबई येथे पाठवण्यात येतात. तसंच सध्या आंब्याचं प्रमाण कमी झाल्यामुळे केळीला मागणी वाढली आहे. दरही पुढील काही दिवसात दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत जातील, असे केळीचे व्यापारी नंदकिशोर देशमुख यांनी सांगितले.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.