नवीन संसाराल पालवी फुटण्याआधीच सर्व संपलं, पतीच्या डोळ्यासमोर पत्नीच्या डोक्यावरून गेलं चाक, सांगलीमध्ये हळहळ.

सांगलीमध्ये एका हृदयद्रावक घटनेत, पतीसोबत दुचाकीवरून कामावर निघालेल्या पत्नीला डंपरने धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. विश्रामबाग उड्डाणपुलावर घडलेल्या या दुर्घटनेत पती गंभीर जखमी झाले आहेत.पतीसोबत दुचाकीवरून कामावर जाण्यासाठी निघालेल्या पत्नीवर आज काळाने घाला घातला. भरधाव डंपरने त्या दामपत्याच्या दुचाकीला धडक दिल्याने पत्नीचा जागीच मृत्यू झाला. ही ह्रदयद्रावक घटना पतीच्या डोळ्यासमोर झाली. आज सकाळी साडेदहाच्या सुमारास विश्रामबाग उड्डाणपुलावर ही घटना घडली आहे.पूनम सुशांत जाधव (२५, रा. कवलापूर, ता. मिरज) असे त्या मृत विवाहितेचे नाव आहे. या अपघातात पती सुशांत जाधव हे जखमी झाले असून खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर संतप्त नागरीकांनी डंपर चालकास पकडून चोप दिला.

संजयनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चालक श्रीकांत नंदकुमार लमाण (रा. मूळ जत सध्या सांगली) याला ताब्यात घेतले. सायंकाळी उशीरा घटनेची नोंद करण्यात आली आहे.पोलिसांनी व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, की दीड वर्षापुर्वी पूनम आणि सुशांत यांचा विवाह झाला होता. पूनम या विश्रामबाग येथील कल्लोळी रुग्णालयात काम करत होत्या. तर सुशांत हे एका कंन्‍ट्रक्शन कंपनीत कामाला आहे. दोघेही दुचाकी (क्र. एमएच १० डीएन ५१००) वरून कामासाठी यायचे. आज देखील दहाच्या सुमारास ते घरातून निघाले. त्यावेळी साडेदहाच्या सुमारास कुपवाडकडून विश्रामबागकडे येत होते. त्यावेळी पुल चढतानाच मागून भरधाववेगाने काँक्रीट मिक्सर डंपर ( क्र. एमएच १७ बिडी ९१२२ ) येत होता.

त्याने पाठीमागून जोराची धडक जाधव दांमप्त्यांना दिली. त्यावेळी पूनम या चाकाखाली सापडल्या. त्यांच्या अंगावरून चाक गेल्याने जागीच त्यांचा मृत्यू झाला.सुशांत हे जखमी अवस्थेत पडले. दरम्यान, हा थरारक प्रकार पाहून नागरिकांनी धाव घेतली. काही अंतरावर डंपरचालकाला अडवून संतप्त नागरिकांनी चांगलाच चोप दिला. यावेळी संजयनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांना रुग्णवाहिकेतून खासगी रुग्णालयात पाठवण्यात आले. उपचारापुर्वीच पूनम यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. घटनास्थळावरून डंपर चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात सायंकाळी उशीरा संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.