माझा प्रामाणिकपणा बघा, स्वतःच दुसऱ्या बायकोबद्दल सांगितलं, शिवसेना आमदाराचं उत्तर, कोर्ट म्हणालं…

हिंदू विवाह कायद्याप्रमाणे पहिली पत्नी असताना दुसरा विवाह अवैध ठरतो. त्यामुळे गावित यांची निवडणूक अवैध ठरवावी’, अशा स्वरूपाची याचिका होती.‘आमदाराची आमदारकी रद्द होण्यासाठी बहुपत्नीत्व या कारणाचा आधार होऊ शकत नाही’, असा निर्वाळा देत मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेना आमदार राजेंद्र गावित यांच्याविरोधातील याचिका फेटाळून लावली आहे. वैवाहिक स्थितीविषयी प्रामाणिकपणे खरी माहिती उघड करण्याने निवडणूक नियमांचा भंग होत नाही, असे निरीक्षणही न्यायमूर्ती संदीप मारणे यांनी निर्णयात नोंदवले.नोव्हेंबर 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे राजेंद्र गावित हे शिवसेनेच्या तिकिटावर पालघर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. ‘गावित यांनी आपल्या उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात अतिरिक्त रकान्यात माहिती दिली.

त्याद्वारे दुसरी पत्नी रूपाली गावित यांच्याविषयी माहिती उघड करत पॅन व प्राप्तिकर विवरणपत्राचा तपशीलही नमूद केला. असा अतिरिक्त रकाना जोडल्याने लोकप्रतिनिधित्व कायद्याने घालून दिलेल्या निकषांचे उल्लंघन झाले. शिवाय हिंदू विवाह कायद्याप्रमाणे पहिली पत्नी असताना दुसरा विवाह अवैध ठरतो. त्यामुळे त्याआधारेही गावित यांची निवडणूक अवैध ठरवावी’, अशा स्वरूपाची याचिका मतदार व सामाजिक कार्यकर्ते सुधीर जैन यांनी केली होती.त्यावर, ‘मी भील या आदिवासी समाजातील आहे. आमच्या समाजात बहुपत्नीत्वाला आडकाठी नाही. त्यामुळे मी स्वत:हून दुसऱ्या पत्नीविषयीचा तपशील उघड केला. माझ्या या कृतीने खरे तर माझा प्रामाणिकपणा दिसून येतो.

त्यामुळे निवडणुकीविषयीच्या कोणत्याही नियमाचा माझ्याकडून भंग झालेला नाही’, असा युक्तिवाद राजेंद्र गावित यांच्यातर्फे करण्यात आला. या युक्तिवादांनंतर न्यायालयाने आमदार गावित यांच्या विरोधातील याचिका फेटाळली.पालघरचेमाजी खासदार असलेल्या राजेंद्र गावित यांनी याआधी काँग्रेसमधून राज्यमंत्रिपद भूषवलेले आहे. त्यानंतर त्यांनी भाजप, शिवसेना पुन्हा भाजप आणि आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांना पालघर विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यांचा सामना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या जयेंद्र दुबळा यांच्याशी झाला होता.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.