मुंबईत कचऱ्यात सापडलेल्या ‘त्या’ वृद्ध महिलेसाठी मदतीचा हात, कॅन्सर इंस्टिट्यूटचा पुढाकार; उपराजधानीत होणार उपचार.

मुंबईतील आरे भागात बेवारस स्थितीत सापडलेल्या कर्करोगग्रस्त वृद्ध महिलेला नागपूरच्या नॅशनल कॅन्सर इंस्टिट्यूटने (एनसीआय) मदतीचा हात पुढे केला आहे. वृत्तपत्रातील बातमी वाचून एनसीआयने महिलेच्या उपचाराची संपूर्ण जबाबदारी उचलण्याचा निर्णय घेतला आहे.मुंबईच्या आरे भागात कुटुंबाने टाकून दिलेल्या एका वृद्ध कर्करोगी महिलेवरील उपचारासाठी नागपुरातील नॅशनल कँसर इंस्टिट्यूटने (एनसीआय) पुढाकार घेतला आहे.दोन दिवसांपूर्वी मुंबईला आरे कॉलनी परिसरात कचरा कुंडीजवळ अंदाजे ६० ते ७० वर्षांची ही महिला बेवारस स्थितीत पडून होती. स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यावर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. या महिलेला त्वचेचा संसर्ग झाला असून, तिला त्वचेचा कर्करोग झाला असल्याचे सूत्रांनी सांगितले. आपण मालाड भागात नातासोबत राहतो.

त्यानेच आपल्याला येथे सोडल्याचे तिने पोलिसांना सांगितले. मात्र आप्तांनी तिला आपण सोडले नसल्याचे स्पष्ट पोलिसांकडे स्पष्ट केले आहे. यापूर्वीही ती घरातून अशीच निघून गेल्याचे त्यांचे म्हणणे आहे.या प्रकाराच्या बातम्या वृत्तपतत्रांत आल्या होत्या. त्या वाचूनच एनसीआयने संबंधित संपादकांशी संपर्क साधून या महिलेबाबात माहिती मागवली आणि तिच्यावर नागपूर येथील एनसीआयमध्ये उपचार करण्याची इच्छा व्यक्त केली.“जेव्हा मला या महिलेबद्दल समजले, तेव्हा वाटले की आपण या अडचणीत सापडलेल्या महिलेची मदत करू शकतो. त्यामुळे मुंबईत फोन करून या आजारी महिलेबद्दल अधिक माहिती घेतली आणि आता तिच्यावरील संपूर्ण कर्करोग उपचारांची जबाबदारी आम्ही घेऊ, असे एनसीआय संचालित केले जाणाऱ्या डॉ. आबाजी थत्ते सेवा आणि अनुसंधान संस्थेचे सरिचटणीस शैलेश जोगळेकर यांनी म्हटले आहे.

या महिलेची ओळख गोपनीय ठेवण्यात आली आहे. सध्या या महिलेवर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.दरम्यान, २३ जून रोजी मुंबईतील आरेच्या जंगलातील कचराकुंडीत एका नातवाने आपल्या आजीला फेकल्याची घटना समोर आली होती. आजीला त्वचेचा कॅन्सर होता. आजी आपल्या नातवासह मालाड परिसरात राहतात अशी माहिती मिळाली. कचऱ्याच्या ढिगाऱ्यात महिला सापडली असल्याची घटना पोलिसांना कळल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. कचऱ्यातून बाहेर काढल्यानंतर आजीला कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला होता. मात्र त्याचवेळी आजीच्या नातवाने आपण आजीला फेकलं नसून तीच घराबाहेर गेली असल्याचं स्पष्टीकरण दिलं.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.