तलाठी पारधींची ‘लॉक्ड’ पांढरी कार जुन्नर पोलीस ठाण्यात, नातेवाईकांची चौकशी सुरु, मोठं गूढ उलगडणार.

दुर्गवाडी येथील रिव्हर्स वॉटर फॉलच्या कड्याखाली रूपालीचा मृतदेह 1200 फुटांवर आणि पारधी यांचा मृतदेह 1350 फुटांवर आढळला होतादुर्गवाडी कोकणकड्याच्या खाली 1300 फूट उंचावरून पडलेले दोन मृतदेह जुन्नर रेस्क्यू टीमच्या पथकाने वर काढले. त्यानंतर ते मृतदेह बेपत्ता असलेले श्रीगोंदा येथील तलाठी रामचंद्र पारधी , वय 40 वर्ष आणि रुपाली खुटाण, वय 17 वर्ष, यांचेच असल्याची खात्री नातेवाईकांनी केली.या घटनेप्रकरणी दुर्गवाडीचे पोलिस पाटील दीपक पारधी यांनी फिर्याद दिल्यानंतर, त्या दोघांनीही कड्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी दोन्ही मृतांच्या नातेवाइकांना बोलावून चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मृत पारधी यांची कोकणकड्यावर असलेली कार कुलूपबंद असल्याने टोईंग करून जुन्नर पोलिस ठाण्यात आणण्यात आली आहे, त्या अनुषंगाने तपास करण्यात येत असल्याची माहीती पोलिस निरीक्षक किरण अवचर यांनी दिली. दोघांच्या आत्महत्येमागे नेमकी कारणे काय आहेत, याचा उलगडा काही दिवसांत होईल असे अवचर म्हणाले.दुर्गवाडी येथील रिव्हर्स वॉटर फॉलच्या कड्याखाली रूपालीचा मृतदेह 1200 फुटांवर आणि पारधी यांचा मृतदेह 1350 फुटांवर आढळला होता, त्यामुळे मृतदेहांच्या शोधासाठी जुन्नर पोलिसांसह जुन्नर रेस्क्यू टीम रविवार, 22 जून रोजी शोध घेण्यासाठी कोकणकड्यावर पोहचले; परंतु तेथे धुके आणि पाऊस यामुळे शोध घेता आला नाही.

त्यातच अंधार पडल्याने या टीमसह पोलिसांनी सोमवार 23 जून रोजी सकाळपासून दरीत उतरून मृतदेहाचा शोध घेतला तेव्हा रुपालीचा मृतदेह आढळून आला, तर त्यापासून काही अंतरावर तलाठ्याचा मृतदेह आढळून आला. त्यानुसार दिवसभराच्या अथक परिश्रमानंतर दोन्ही मृतदेह रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी दरीच्या वर काढले.दरम्यान, घटनास्थळी असलेल्या बॅगमध्ये तलाठी रामचंद्र पारधी आणि रुपाली खुटाण यांच्या स्वतंत्र सुसाइड नोट पोलिसांना आढळल्या आहेत. रामचंद्र पारधींनी सुसाइड नोटमध्ये आई-वडील आणि भावाची माफी मागितली आहे. माझी पत्नी आणि तिच्या नातेवाईकांनी मानसिक त्रास दिलाय. ती आणि तिच्या नातेवाईकांविरोधात कायदेशीर कारवाई करा, अशी मागणी पारधींनी केली आहे. रुपाली खुटाणनेही आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहित आई वडिलांकडून होणाऱ्या त्रासामुळे आयुष्य संपवत असल्याचे म्हटले आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.