तीन कुटुंबप्रमुखांवर काळाचा घाला, अख्खं गाव रुग्णालयात जमलं, बायको-पोरांचा टाहो.

 दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती गावाजवळ एक भीषण अपघात झाला. डंपरने दुचाकीला धडक दिल्यामुळे तीन मजुरांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर डंपर चालकाने फरार होऊन बचाव केला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेने मुस्ती गावात शोककळा पसरली आहे.जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यात एक दुःखद घटना घडली. मुस्ती गावाजवळ एका डंपरने तीन मजुरांना चिरडले. हे तिघेहीजण एकाच दुचाकीवरून जात होते. या अपघातात तिघांचाही जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी(२४ जून) घडली. अपघातानंतर डंपर चालक फरार झाला आहे. मृतांमध्ये देवीदास मारुती दुपारगुडे (वय ३३), नितीन शाम वाघमारे (वय ३२) आणि हनमंत गोपीनाथ पवार (वय ४०) यांचा समावेश आहे. या घटनेमुळे मुस्ती गावावर शोककळा पसरली आहे.मुस्ती गावातील हे तिघे तरुण धोत्री गावाकडे निघाले होते. ते एकाच दुचाकीवरून प्रवास करत होते. त्यावेळी माती घेऊन जाणाऱ्या एका डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

ही धडक इतकी भीषण होती की, तिघेही मजूर जागीच ठार झाले. अपघातानंतर डंपरचालक घटनास्थळावरून पळून गेला. पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला आहे.अपघाताची माहिती मिळताच गावातील लोक घटनास्थळी जमा झाले. मुस्तीजवळ तलावानजीकच्या वळणावर हा अपघात झाला. डंपरने दुचाकीला मागून धडक दिली. “काही कळायच्या आत डंपरचालक वाहनासह पळून गेला”, असे गावकऱ्यांनी सांगितले. या अपघातात एकजण डंपरखाली चिरडला गेला, तर दोघे रस्त्याच्या बाजूला फेकले गेले. दुचाकीची अवस्था पाहून अपघाताची भीषणता लक्षात येते.मनोहर राठोड नावाचे शेतकरी सर्वात आधी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी हणमंत पवार यांना ओळखले. त्यांनी तातडीने गावात माहिती दिली. शामराव जाधव, नितीनचे वडील श्याम आणि तिप्पणा जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली.

त्यांनी तिघांनाही तातडीने सोलापूरच्या शासकीयरुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी करून तिघांनाही मृत घोषित केले. या घटनेने मुस्ती गावावर शोककळा पसरली असून शासकीय रुग्णालयात संपूर्ण मुस्ती गाव दाखल झाला होता.तिघे मजूर हे कुटुंबप्रमुख होते आणि कुटुंबाची जबाबदारी होती. मृत देवीदासच्या पश्चात पत्नी आणि तीन लहान मुले, नितीनच्या पश्चात पत्नी, मुलगा, एक मुलगी, तर हणमंतच्या पश्चात पत्नी, अडीच वर्षांचा मुलगा आणि चार मुली आहेत. या घटनेने तीनही कुटुंबे उघड्यावर पडली आहेत.तिन्ही मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.मंगळवारी रात्री उशिरा तिघांवर अंतिम संस्कार करण्यात आले.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.