प्राजक्त तनपुरेंनी कारखान्याची निवडणूक मारली, पण ‘चेअरमन’ काकांचा धक्का, देवगिरीवर रात्रीत ‘घड्याळ’ बांधलं.

कारखान्याला नवसंजीवनीची आशा असल्याने सत्तेपासून दूर राहून चालणार नाही, असा समज असल्याने गेल्या काही दिवसांपासून अरुण तनपुरे हे अजित पवार यांच्या गटात सामील होणार असल्याची चर्चा होतीअहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरीतील डॉ. तनपुरे साखर कारखान्याचे नवनियुक्त चेअरमन, तसेच बाजार समितीचे सभापती, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचे चुलते अरुण तनपुरे आणि त्यांचे सुपुत्र व कारखान्याचे संचालक हर्ष तनपुरे यांनी मोठा निर्णय घेतला. मंगळवारी रात्री देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात अधिकृत प्रवेश केला. शरद पवार यांच्यासोबत असलेले माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. मात्र आता प्राजक्त तनपुरे यांच्या भूमिकेकडेही लक्ष लागले आहे.

नुकत्याच झालेल्या तनपुरे कारखान्याच्या निवडणुकीत तनपुरेंनी एकतर्फी विजय मिळवत कारखाना ताब्यात घेतला. कारखान्याला नवसंजीवनीची आशा असल्याने सत्तेपासून दूर राहून चालणार नाही, असा समज असल्याने गेल्या काही दिवसांपासून अरुण तनपुरे हे अजित पवार यांच्या गटात सामील होणार असल्याची चर्चा होती, त्याला आता अधिकृत स्वरूप प्राप्त झाले.या प्रवेशासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत आणि राहुरी शहराध्यक्ष सुनील भट्टड यांनी महत्त्वपूर्ण शिष्टाई केली. प्रवेशावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार काशिनाथ दाते, जिल्हाध्यक्ष अशोक सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढील आठवड्यात अरुण तनपुरे यांचे समर्थक व स्थानिक कार्यकर्त्यांचा मोठा सामूहिक अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याने प्रवेश सोहळा आयोजित केला जाणार आहे. विशेष म्हणजे, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचे चुलते असलेले अरुण तनपुरे यांनी अजित पवार गटात प्रवेश केल्याने प्राजक्त तनपुरे यांची भूमिका काय असेल याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.राजकारणात गणितं बदलत असतात, कोण कुठे जाईल काही सांगता येत नाही, कारखाना निवडणुकीवेळी असं वक्तव्य केल्याने राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्राजक्त तनपुरेंच्या मनात चाललंय तरी काय? अशी चर्चा सुरू झाली होती मात्र आता अरुण तनपुरेंनी अजित पवार गटात प्रवेश केला असून प्राजक्त तनपुरे काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.