ढाब्यावर जेवण, घरी परतताना आक्रित, भीषण अपघातात कारचा चक्काचूर, तिघा मित्रांचा मृत्यू.

छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्गावर बिल्डा फाट्याजवळ भीषण अपघात झाला. पाच मित्रांच्या कारला अपघात होऊन तीन जण जागीच ठार झाले. तर दोघे जखमी आहेत. फुलंब्रीहून जेवण करून परतत असताना भरधाव वेगामुळे कार दुभाजकाला धडकली.छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात झाला आहे. पाच मित्र धाब्यावरुन जेवण करून छत्रपती संभाजीनगरकडे परतत असताना भरधाव कार रस्त्यावरील पुलाच्या दुभाजकाला धडकल्याने अपघात झाला. या अपघातात ३ जण जागीच ठार झाले आहेत. तर दोन जण गंभीर जखमी आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की चारचाकी वाहनाचा अक्षरशः चुराडा झाला आहे. ही घटना छत्रपती संभाजीनग र- जळगाव राष्ट्रीय महामार्ग बिल्डा फाट्याजवळ मंगळवारी, २४ जून रोजी रात्री बारा वाजेच्या सुमारास घडली.

जखमींवर छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.याप्रकरणी स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर शहरातील पाच जण फुलंब्री रस्त्यावरील ढाब्यावर एम.एच २० इ.जे.१५८६ या कारने जेवण करण्यासाठी गेले होते. जेवण झाल्यानंतर फुलंब्री येथून छत्रपती संभाजीनगरकडे छत्रपती संभाजीनगर – जळगाव राष्ट्रीय महामार्गावरुन ते येत होते. भरधाव वेगात असलेली चारचाकी बिल्डा फाट्याजवळ आली. यावेळी कारचालकाला रस्त्यावरील पुलाचा अंदाज न आल्याने कार थेट पुलाच्या दुभाजकाला धडकली. हा अपघात एवढा भीषण होतं की कार रस्त्यात उलटली.या भीषण अपघातात अरफात बागवान, रेहान सय्यद, सय्यद मारूफ यांचा जागीच मृत्यू झाला.

तर सय्यद उजेफ, शेख शारीक हे गंभीर जखमी झाले. दरम्यान या भीषण अपघाताची माहिती फुलंब्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सहाने यांना मिळाली. पोलीस निरीक्षक संजय सहाने यांनी तात्काळ कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवले. नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी जखमींना छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी रुग्णालयात दाखल केले. या घटनेमुळे घटी रुग्णालयात मोठी गर्दी जमली होती. मृताच्या नातेवाईकांनी घाटी रुग्णालयामध्ये टाहो फोडला.सय्यद मारुन माजीद – वय १८ वर्षे रा. रोशन गेट, रियान जमील शेख – वय १६ वर्षे रा. पिऺप्री राजा ता. छत्रपती सऺभाजीनगर, अरफात आसिफ शेख – वय १७ वर्षे रा. पिऺप्री राजा, अशी मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावं आहेत. अपघातातील दोघे जखमी शरीफ शेख आणि उजेर खान सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.