विश्वास कुणावर ठेवायचा? घरात मंगलकार्य आणि ह्याचं भलतंच सुरु, लबाड दिराने डाव साधला अन् वहिनीच्या खोलीत शिरुन डल्लाच मारला.

छत्रपती संभाजीनगरमध्ये एका गृहप्रवेश कार्यक्रमात एक अनपेक्षित वादळ उठले. एका व्यक्तीने नात्या-गोत्याचा फायदा घेत दोन तोळ्यांचे दागिने चोरले. या घटनेने उपस्थितांना चकित केले, आणि पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले.सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: आजकालच्या जमान्यात कोणावर विश्वास ठेवावा अन् कुणावर नाही हाच सगळ्यात मोठा टास्क आहे. कधी कोण कसा घात करुन जाईल, काहीच सांगता येत नाही. जवळचा नातेवाईक जेव्हा पाठीत खंजीर खुपसतो तेव्हा नात्यांवरचा विश्वासही उडतो. नात्यात विश्वासघात केल्याची अशीच एक घटनाछत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे. एका गृहप्रवेश कार्यक्रमात धक्कादायक घटना घडली. दिरानेच मोठ्या वाहिनीचे दोन तोळ्यांचे दागिने चोरले. नातेवाईकांच्या गर्दीचा फायदा घेऊन त्याने हे कृत्य केले. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, त्याच्याकडून 1 लाख 64 हजार 900 रुपयांचे दागिने जप्त केले आहेत.

पवन नगर रांजणगाव शेणपुंजी परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी सुरुवातीला अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. मेहराज दस्तगीर पठाण (वय २०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो रांजणगाव शेणपुंजीचा रहिवासी आहे. अबुदर दस्तगीर पठाण यांनी २३ जून रोजी MIDC पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.अबुदर यांनी तक्रारीत सांगितले की, १७ जून रोजी त्यांच्या घरी घरभरणीचा कार्यक्रम होता. कार्यक्रमात खूप नातेवाईक आले होते. याच गर्दीत अज्ञात व्यक्तीने २० ग्रॅम सोने चोरले. गुन्हा दाखलझाल्यावर पोलिसांनी तपास सुरू केला.

पोलीस उपनिरीक्षक प्रवीण वाघ, हवालदार बाळू लहरे, मनोहर गीते, विजय भानुसे, रूपाली राणे, कृष्णा गायके, विजय निकम यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास केला.दरम्यान, मेहराज दागिने विकायला एका सराफा व्यापाऱ्याकडे गेला. सराफा व्यापाऱ्याला त्याच्यावर संशय आला. त्याने तात्काळ गुन्हे शाखेला माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत मेहराजला अटक केली. त्याच्याकडून १ लाख ६४ हजार ९०० रुपयांचे दागिने जप्त केले. अबुदर पठाण यांच्या म्हणण्यानुसार, “१७ जून रोजी आबुदर पठाण यांच्या घरी घरभरणीचा कार्यक्रम होता यासाठी मोठ्या प्रमाणात नातेवाईक आले होते. यामध्ये अज्ञात व्यक्तीने 20 ग्राम सोने लंपस केल्याची तक्रार करण्यात आली.” या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.