महिन्याभरात 2000 कॉल, लग्नाआधी बेपत्ता, सुपारी देऊन पतीची हत्या; सोनममुळे अडकली ऐश्वर्या.

सोनम रघुवंशीने मेघालयमध्ये हनीमून दरम्यान पती राजाची हत्या केली. यानंतर तेलंगणातील कुरनूलमध्ये तेजेश्वर नावाचा तरुण बेपत्ता झाला. तपासात तेजेश्वरची पत्नी ऐश्वर्या आणि तिच्या आईचे एका बँक कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध असल्याचे उघड झाले.हैदराबाद: गेल्या महिन्याभरापासून राजा आणि सोनम रघुवंशी यांची चर्चा सर्वत्र सुरु आहे. लग्नानंतर हनिमूनसाठी गेलेल्या सोनमनं मेघालयमध्ये पतीची हत्या घडवून आणली. लग्नानंतर अवघ्या १२ दिवसांत तिनं पती राजाची हत्या केली. या हत्येचा तपास अनेक दिवस चालला. अखेर सोनम, तिचा प्रियकर राज आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या हातात बेड्या पडल्या. इंदूरच्या सोनममुळेच तेलंगणातील कुरनुलमधील हत्येचा उलगडा झाला.फेब्रुवारी २०२५ मध्ये तेलंगणाच्या कुरनुलमधील ऐश्वर्याचं लग्न तेजेश्वर नावाच्या तरुणाशी ठरलं. १८ मे रोजी लग्न होणार होतं. पण त्याआधी १३ मे रोजी ऐश्वर्या एकाएकी गायब झाली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. पण ४ दिवसांनी ती घरी परतली. या कालावधीत ती पळून गेल्याच्या अफवा पसरल्या. आईवर हुंड्यासाठी दबाव असल्यानं एकाएकी घरातून निघून गेले आणि मित्राच्या घरी राहिले असं तिनं सांगितलं. तिनं तेजेश्वरची माफी मागितली आणि ठरलेल्या दिवशी विवाह संपन्न झाला.

आपल्याला तेजेश्वर सोबत आयुष्यभर राहायचं असल्याचं ऐश्वर्या म्हणाली. पण लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी तिचं वर्तन बदललं. ती दिवसभर मोबाईल वापरायची. तासनतास फोनवर बोलायची. तेजेश्वरनं विचारणा करताच टोलवाटोलवी करायची. या सगळ्या गोष्टी तेजेश्वरनं कुटुंबियांना सांगितल्या. त्यांनी तेजेश्वरची समजूत घातली. यानंतर १७ जूनला तेजेश्वर घरातून बाहेर पडला. तो घरी परतलाच नाही. संपूर्ण कुटुंबानं त्याचा शोध घेतला. पण ठावठिकाणा न सापडल्यानं कुरनुल पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली.तेजेश्वरचं कोणासोबत वैर होतं का, त्याचा शोध पोलिसांनी घेतली. पण हाती काहीच लागलं नाही. याचवेळी राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशीचं प्रकरण उजेडात आलं होतं. नवविवाहित सोनमनंच तिचा पती राजाची हत्या केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं होतं. ही बाब लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाची दिशा बदलली. या प्रकरणालाही अनैतिक संबंधांची किनार आहे का, याचा शोध पोलिसांनी सुरु केला. कुटुंबियांच्या चौकशीत ऐश्वर्याच्या वर्तनाबद्दल समजताच तिला ताब्यात घेण्यात आलं. तिच्या चौकशीनंतर तिच्या आईला चौकशीसाठी बोलावलं गेलं. यानंतर दोघींना अटक करण्यात आली.ऐश्वर्यानं लग्नानंतर महिन्याभरात एका बँक कर्मचाऱ्याला २००० हून अधिक कॉल केले होते. त्याच्यासोबत ऐश्वर्याचे प्रेमसंबंध असल्याची माहिती तपासातून समोर आले. पोलिसांनी काढलेले सीडीआर आणि अन्य पुरावे पाहून ऐश्वर्या आणि तिची आई बिथरली. त्यांनी गुन्हा कबूल केला. ऐश्वर्या आणि तिची आई सुजाताचे बँक कर्मचाऱ्याशी प्रेमसंबंध होते. आधी सुजाता आणि मग ऐश्वर्याचं कर्मचाऱ्याशी सूत जुळलं होतं.तेजेश्वर आपल्या मार्गातील अडथळा ठरेल, अशी भीती मायलेकींना आणि त्यांच्या प्रियकराला होती. तेजेश्वरची हत्या करुन मार्गातील अडथळा दूर करायचा आणि मग त्याची संपत्ती मिळवायची, असा कट तिघांनी आखला. त्यानंतर १७ जूनला तेजेश्वरचं एका कारमधून अपहरण करण्यात आलं. धारदार शस्त्रानं वार करुन त्याची हत्या करण्यात आली. यानंतर त्याचा मृतदेह एका निर्जनस्थळी फेकण्यात आला.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.